म्हसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

Spread the love

म्हसवड प्रतिनिधी . (शहाजी लोखंडे)—-

सन 2019 मधील चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेले आणि 6 वर्षांपासून मा.न्यायालयात हजर न राहिल्यामुळे नॉन बेलेबल वॉरंट मध्ये पाहिजे असलेल्या 2 आरोपींना शीताफिने अटक

हकीकत

सन 2019 साली म्हसवड पोलीस ठाण्यात पानवण या गावातील आरोपी नामे 1)महेश पबलू चव्हाण आणि 2) रंगनाथ मुरलीधर चव्हाण दोघे राहणार चव्हाणवाडी, पानवण तालुका माण, जिल्हा सातारा यांच्यावर ipc 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र माननीय न्यायालयात दाखल आहे. सदरचे दोन्ही आरोपी 2019 पासून माननीय न्यायालयात या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी हजर न राहता तब्बल 6 वर्ष अजामीनपात्र वॉरंट निघून सुद्धा मिळून येत नव्हते. या दोन्ही आरोपींचा तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गोपनीय यंत्रणा सतर्क करून माहिती घेऊन शिताफीने पकडून नॉन बेलेबल वॉरंट मध्ये अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणेभगवान सजगणे
नीता पळे योगेश सूर्यवंशी,अभिजीत भादुले,युवराज खाडे यांनी या कारवाईत भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!