श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण,

Spread the love

पंढरपूर दि.21= श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी माधवानंद महाराज गुरु वामनानंद स्वामी चिन्मयमूर्ती संस्थान, यवतमाळ येथील भाविकांनी सुमारे 17 लाख 68 हजार किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

त्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने देणगीदार भाविकाचा मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन येथोचित सन्मान केला.

सदर सोन्याचा तुळशीहार 232.990 ग्रॅम वजनाचा असून, त्याची अंदाजे किंमत 17 लाख 68 हजार रुपये इतकी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!