म्हसवड :
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या 1500 व्या जयंतीनिमित्त, येत्या ५ सप्टेंबर रोजी म्हसवड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने भगवान गल्ली येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन माण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांच्या हस्ते होणार आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व औषधे मिळणार असून, विविध आजारांवर मार्गदर्शनही केले जाणार आहे.
🔹 हृदयविकार तज्ञ – डॉ. प्रमोद गावडे
🔹 अस्थिरोग तज्ञ – डॉ. बाबासाहेब दोलताडे
🔹 नेत्ररोग तज्ञ – डॉ. निखिलेश शेटे
🔹 दंतरोग तज्ञ – डॉ. सौरभ दोशी
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसवडचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीही शिबिरात सहभागी होणार आहेत.
या जयंतीनिमित्त मशिदींमध्ये कुरआन पठण, पैगंबरांच्या जीवनावरील व्याख्याने, मिरवणुका, मशिदींची व गल्लीबोळांची सजावट, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे, मोफत वैद्यकीय शिबिरे व सामूहिक भोजन आयोजित करून पैगंबरांचा “मानवतेची सेवा” हा संदेश जिवंत ठेवला जातो.
या शिबिरामुळे शेकडो नागरिकांना मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळणार असून, पैगंबरांच्या जयंतीनिमित्त मानवतेची व सेवा भावनेची परंपरा जपणारा उपक्रम ठरणार आहे.