गोंदवले –
भारतीय मजदूर संघ ही देशातली एक क्रमांकाची कामगार क्षेत्रात काम करणारी संघटना आहे. कामगारांच्या हिताबरोबरच सामाजिक समरसता जपण्याचं काम भारतीय मजदूर संघाने आजपर्यंत केलेला आहे.बहिण भावाच्या नात्यांचे ऋणानुबंध राखीच्या धाग्यात बांधण्याचा रक्षाबंधन सण, रक्षाबंधन हा सण केवळ भाऊ बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित नसून त्याला व्यापक सामाजिक महत्त्व आहे म्हणून भारतीय मजदूर संघ सातारा जिल्हाच्यावतीने बांधकाम कामगार महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ रेश्मा शीलवंत यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम माण तालुक्यातील असंघटित व बांधकाम कामगार क्षेत्रातील महिलांना सोबत घेऊन म्हसवड व दहिवडी पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी बांधवांच्या सोबत रक्षाबंधन हा पवित्र सण राखी बांधून साजरा करण्यात आला.त्यावेळी काही पोलीस बांधवांनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या आमच्या बहिणी पण घरी आले आहेत पण आम्ही ड्युटीवर असल्यामुळे घरी जाऊ शकत नाही. तुम्हीच आमच्या बहिणी बनवून आलात खूप छान वाटलं. एक पोलिस बांधव म्हणाले काही लोकांना बहीण नसते काही लोकांना भाव नसतो पण या उपक्रमामुळे ती पोकळी तुम्ही भरून काढलेत तुमच्या सर्व बहिणीचे मनापासून खूप खूप स्वागत. राखी बांधायला गेलेल्या एका बहिणीने तिच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या की दहा-बारा वर्षे झाले माझे भाऊ या जगात नाहीत पण मी आज दहा-बारा वर्षानंतर रक्षाबंधन हा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला हे सांगताना त्या बहिणीचे अश्रू अनावर झाले होते. पोलीस यंत्रणा सतत आपल्या जबाबदारी मध्ये काम करत असतात,आपली सेवा करत असतात त्यामुळे यावेळी उपक्रमाचे सगळ्यांनी खूप खूप कौतुक केले. या कार्यक्रमांमध्ये बांधकाम कामगार महासंघप्रदेश उपाध्यक्ष सौ रेश्मा शीलवंत यांच्यासह उर्मिला वाघमारे,अश्विनी सातपुते, मिलन खरात, पुष्पा अवघडे, वंदना पवार, उज्वला इंजे, अस्मिता तुपे, मनीषा वाघमारे या सर्व भगिनी तसेच माण तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी सहभाग घेतला. चहापाणी व मिठाईवाटून हा कार्यक्रम संपन्न झाला व विशेष सहकार्य श्री अरविंद इंजे यांनी केले.
छाया – बांधकाम कामगार महासंघ प्रदेश उपाध्यक्ष सौ रेश्मा शिलवंत, उर्मिला वाघमारे, उज्वला इजे, मनिषा वाघमारे , अस्मिता तुपे,पुष्पाअवघडे
