स्मित प्रोऍक्टिव्ह अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश

Spread the love

सातारा (वृत्तसेवा)-
अबॅकस आणि वैदिक मॅथ्स स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा झेंडा उंचावला!
पुणे येथे ११ जून २०२५ रोजी आयोजित केलेल्या गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे पार पडलेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस आयोजित “समर अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन २०२५ ” व वैदिक मॅथ्स नॅशनल कॉम्पिटिशन २०२५ या दोन भव्य राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये स्मित प्रोऍक्टिव्ह अकॅडमी, म्हसवड येथील विद्यार्थ्यांनी अप्रतिम कामगिरी करत आपले नाव संपूर्ण देशभरात उजळवले आहे.

स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातून हजारो स्पर्धक सहभागी झाले होते. स्मित प्रोऍक्टिव्ह अकॅडमी कडून एकूण २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये 8 ट्रॉफी विजेते व 14 फायनॅलिस्ट्स ठरले आहेत.

अबॅकस स्पर्धेतील उल्लेखनीय विजेते – शिवांश शिवलिंग शिंदे याने १०० पैकी १०० गणिते अवघ्या ३ मिनिटे ५ सेकंदात सोडवून प्रथम क्रमांक ,रुद्र कुशल भागवत – द्वितीय क्रमांक,अथर्व दत्तात्रय निकम याने चतुर्थ क्रमांक,शिवम रणजित कालेकर याने पाचवा क्रमांक मिळविला.

फायनॅलिस्ट ट्रॉफी विजेते
जुई गळवे, शौर्या मंडले, संस्कृती गराळे, आरती ढेरे, श्रुष्टी माईणकर, श्रेया शेंडगे, आरव गलंडे, स्वरा माने, भार्गव झिम्बल, विश्वजित ढाले, स्पर्श काळेल, यशदा काळेल, वरद काटकर, आर्या काटकर हे विजेते ठरले.
विजेत्यांना मा. श्री. गिरीश करडे सर, मा. श्री. अजय मणियार सर व सौ. तेजस्विनी मॅडम यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

वैदिक मॅथ्स स्पर्धेतील उत्तुंग यश –
स्मित शरद जाधव याने द्वितीय क्रमांक, शुभम संजय गलंडे तृतीय क्रमांक व सार्थ सारंग मासाळ चतुर्थ क्रमांक,ओम बाळू कलढोणे पाचवा क्रमांक मिळविला.

या यशामागे शरद जाधव सर, अनिता जाधव मॅडम, अमिषा काळेल मॅडम, प्रांजली फडतरे मॅडम, वेदिका कवडे मॅडम व केंगार सर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!