म्हसवड – ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सौ. सोनिया गोरे यांनी सामाजिक कार्यकर्ते इंजि. सुनील पोरे यांच्याशी असलेला स्नेहबंध दृढ केला.

म्हसवड – वृत्तसेवा : रक्षाबंधनाच्या पवित्र व भावनिक सणानिमित्त, राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सौ. सोनिया गोरे यांनी सामाजिक कार्यकर्ते व नासपचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांना राखी बांधून औक्षण केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बोराटवाडी येथील मंत्री गोरे यांच्या निवासस्थानी झालेल्या या सोहळ्यात सौ. गोरे यांनी पोरे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख करताना सांगितले, “इंजि. सुनील पोरे हे आमच्या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे सदस्य आहेत. ते मंत्री जयकुमार गोरे यांचे निष्ठावंत सहकारी असून, म्हसवड व परिसरातील अनेक विकासकामांत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, पाणीपुरवठा व रस्त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी इंजि. पोरे यांनी केवळ प्रयत्नच केले नाहीत, तर उपोषणासारखे कठोर पाऊल उचलले. कोरोना काळात त्यांनी अन्नदान, अँब्युलन्स सेवा व औषध वाटप अशा विविध उपक्रमांतून मानवतेचे उदाहरण घालून दिले.
“आगामी काळात पोरे यांच्या हातून मोठी विकासकामे घडावीत, यासाठी या पवित्र सणाच्या निमित्ताने मी त्यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या,” असे सौ. गोरे म्हणाल्या.
या कार्यक्रमाला बाळासाहेब पिसे यांसह मान्यवर उपस्थित होते.