पुणे मेट्रो सुपरवायझर ऑफिसर पदी पत्रकार कु.रविना यादव

Spread the love

पत्रकार कु.रविना यादव बनल्या पुणे मेट्रो सुपरवायझर ऑफिसर


(अजित जगताप):

दुष्काळी खटाव तालुक्यातील एनकुळ गावचे रहिवासी मुख्याध्यापक श्री.रघुनाथ यादव यांची नात व महाराष्ट्र एस टी महामंडळातील सातारा विभागाचे सहाय्यक वाहतुक निरीक्षक श्री.आनंदकुमार उर्फ आप्पासाहेब यादव यांची कन्या कु.रविना यादव यांनी स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पुणे मेट्रो सुपरवायजर ऑफिसर पदी निवड झाली आहे.

पत्रकारिता क्षेत्रानंतर थेट मेट्रो सेवेत दाखल झालेल्या सॉरी रविना यादव यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
कु.रविना यादव यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर हुतात्मा परशुराम विद्यालय मधे विद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. . अकरावी आणि बारावी दहिवडी महाविद्यालय आणि इंग्रजी विषय ठेवून वडूज येथील दादासाहेब जोतिराम गोडसे महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले . तसेच डिजिटल महा मीडिया असोसिएशन महाराष्ट्र अंतर्गत पत्रकारिता ही पदवी प्राप्त केली आहे.
छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर येथे डिस्टिंक्शन मधून अमेरिकन लिट्रेचर स्पेशल विषय घेऊन इंग्लिश विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. कुमारी
रविना यांना लहानपणापासून वाचनाची लिखाणाची प्रचंड आवड होती.आपली आवड जोपासत त्यांनी अनेक बक्षीसे व पुरस्कार मिळविले आहेत. रविना या विद्येचे माहेरघर म्हंटले जाणाऱ्या पुणे येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती.आणि २२ मार्च ला झालेल्या महाराष्ट्र मेट्रो रेल स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचा मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमधे पहिल्याच प्रयत्नात मेन्स आणि इंटरव्यू मधे १७९ मार्क्स मिळवून फर्स्ट रैंक मधे येऊन पुणे मेट्रो सुपरवायजर ऑफिसर पदी निवड झाली.
रविना यादव यांनी मिळवलेल्या यशाबद्धल सर्व स्तरांतून तसेच ग्रामस्थ यांचा कडून कौतुक होत आहे. पत्रकारिता क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केलेल्या कुमारी रवीना यादव यांनी अल्पावधीमध्ये अनेक प्रश्न मांडून लेखणीच्या माध्यमातून जनसेवा केले आहे आता मेट्रोच्या माध्यमातून प्रवाशांची लोकसेवा त्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे अशा शब्दात त्यांचा गौरव केला जात आहे.


फोटो – पुणे मेट्रो सेवेत सुपरवायझर ऑफिसर पदी निवड झालेल्या कुमारी रवीना यादव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!