माण तालुका कृषीनिष्ठ सामाजिक संस्थेकडुन वृक्षारोपण

Spread the love


दहिवडी प्रतिनिधी: जयराम शिंदे
राजधानी सामाजिक कृषीनिष्ट संस्था सातारा विभाग माण यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जुलैला कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्राथमिक शाळा आंधळी पुनर्वसन गोसावी मळा दहिवडी. ह्या ठिकाणी वृक्षारोपनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी संस्थेच्या वतीने शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून वृक्ष संरक्षणाकरिता रोपांना ट्री गार्ड देखील बसविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. मंगेश काटकर यांनी केले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आणि मान्यवर , माण तालुका डिलर असोसिएशनचे अध्यक्ष श्री. राजु जगदाळे, दहिवडी आगार व्यवस्थापक श्री. डुबल साहेब, दहिवडी आगार वहातुक नियंत्रक आणि माण तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष श्री.संतोष बोराटे, माजी तालुका मंडल कृषी अधिकारी श्री. राजेंद्र मोरे ,तसेच मुख्याध्यापिका भोईटे मॅडम, जाधव मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक आंधळी पुनर्वसन शाळेचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

माजी तालुका मंडल कृषी अधिकारी श्री. राजेंद्र मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना या उपक्रमाचे कौतुक केले झाडाचे आणि पर्यावरणाचे महत्व पटवून सांगीतले येणाऱ्या नव्या पिढीला याचे महत्व समजवुन त्यांच्यामध्ये रुजवने काळाची गरज आहे. प्रमुख उपस्थिती आगार व्यवस्थापक डुबल साहेब यांनी माण तालुक्यात झाडे लावण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच माण तालुका डिलर असोसिएशन चेअध्यक्ष राजेंद्र जगदाळे यांनी सर्वांचे आभार मानले .

यावेळी माण तालुका राजधानी कृषीनिष्ठ संस्थेचे अध्यक्ष अविनाश काटकर, उपाध्यक्ष अविनाश तुपे, खजिनदार पांडुरंग जगदाळे,सचिव अक्षय ढेंबरे,
संपर्क प्रमुख सौरभ जाधव, मंगेश काटकर, योगेश गायकवाड, योगेश दडस, तुषार संकुडे, सुमित सरतापे, चर्चिल खरात साहेब यांची उपस्थिती होती. संस्थेचे पदाधिकारी श्री. कपिल चव्हाण यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

वृक्षारोपण करताना पदाधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!