प्रतिनिधी वडूज -विनोद लोहार
सातारा जिल्हा परिषद कार्यालय येथे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा टीम तर्फे निवेदन सादर करण्यात आले.*या निवेदनाद्वारे पवित्र पोर्टल ची रजिस्ट्रेशन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी तसेच संच मान्यता व नामावली प्रक्रिया पूर्ण करून ती पवित्र पोर्टलला पाठविण्यात यावी, अशी ठोस मागणी मा. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, जिल्हाधिकारी, जिल्हा कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक या सर्वांकडे करण्यात आली.
यावेळी निवेदन सादर करताना पुढील अभियोग्यताधारक बांधव उपस्थित होते
अमित देसाई रजिया मुलाणी,विशाल घोरपडे ,अविष्कार डोईफोडे,मज्जीद मुजावर,शिवानी पवार,अश्विनी भिसे अदिती मोहोळकर,प्रतीक्षा काळे,अंजली यादव,ओंकार मुळीक,आकाश कुंभार,लक्ष्मी पवार,सिद्धेश सुतार.
सातारा टीम — युवा विद्यार्थी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य.
