गतिरोधक न केल्यास भाळवणीचे सरपंच रणजीत जाधव करणार आमरण उपोषण.
पंढरपूर म्हसवड ,भाळवणी पिराची कुरोली या रस्त्यावर गतिरोधक करण्याची मागणी

सरपंच रणजीत जाधव
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सरपंच रणजीत जाधव हे पंढरपूर ते म्हसवड व भाळवणी ते पिराची कुरोली या रस्त्यावर गतिरोधक करणे अत्यावश्यक झालेले आहे. याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे भाळवणी गावचे सरपंच रणजीत जाधव हे पंढरपूर तहसील कचेरी समोर आमरण उपोषणास बसणार आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पंढरपूर ते म्हसवड हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ई असून हा रस्ता भाळवणी गावातून जात आहे. या रस्त्यावरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी या दोन्हीही संस्थेचे अंदाजे 3 हजार विद्यार्थी ये जा करीत असतात. तसेच सांगोला कडे येण्या जाण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. याचा परिणाम म्हणून या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. यास जबाबदार कोण राहणार ? असा सवाल नागरिकाकडून केला जात आहे.तरी महीम चौक,एस टी स्टँड जवळ,लिंगे शॉपिंग सेंटर परिसरात तात्काळ गतिरोधक करण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे. तात्काळ गतिरोधक न केल्यास सरपंचसह,ग्राम.सदस्य, विद्यार्थ्यां,पालक,महिला, व ग्रामस्थ आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला चौकट
यापूर्वी वेळोवेळी ग्रामपंचायत कडून संबंधित विभागास गतिरोध करण्याबाबत पत्रव्यवहार करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद न दिल्यामुळे व ग्रामस्थांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्यामुळे मी स्वतः पंढरपूर तहसील कार्यालय येथे 25/2/2025 रोजी आमरण उपोषणास बसणार आहे. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ गतिरोधक करून सहकार्य करावे असे आव्हान मी करीत आहे.
सरपंच रणजीत जाधव ग्रामपंचायत भाळवणी.
चौकट
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे या विभागात दिनांक 29 /8 /2024 रोजी जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या दरम्यान रबलर स्ट्रिप करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यास अनुसरून कार्यकारी अभियंता दिपाली पोतदार यांनी दिनांक 3/9/2024 रोजी या ठिकाणी रबलर स्ट्रिप तयार करून अहवाल सादर करण्याचे पत्रात सांगितले होते.तरी ही वरिष्ठ अधिकारी पत्रव्यवहार करूनही कनिष्ठ अधिकारी काम करीत नसतील तर संबंधित तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सहदेव नावडे पालकतसेच भाळवणी ते पिराची कुरोली या रस्त्यावरही गतिरोधक करणे गरजेचे आहे. हा रस्ता गावाच्या मधून जात असल्यामुळे या रस्त्यावर लहान मुले महिला ग्रामस्थ यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच या रस्त्यावरून पांडुरंग व वसंतराव काळे साखर कारखान्याच्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरही सतत लहान मोठे अपघात घडत आहेत. तरी एस टी स्टँड जवळ,मशीद,म्हेत्रे कॉर्नर,भीमनगर चौक,गोंधळी चौक, अण्णाभाऊ साठे नगर चौक येथे गतिरोधक करणे आवश्यक आहे.तरी संबंधित विभागाने या दोन्ही रस्त्यावर गतिरोधक तात्काळ करावेत अशी मागणी ग्रामस्थांमधूनही केली जात आहे.