म्हसवड वृत्तसेवा-
माऊली फाउंडेशन संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावरील आषाढी वारीसाठी वारकऱ्यांकरिता वैद्यकीय सेवेत सुलभता येण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते इंजिनीयर सुनील पोरे यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यामुळे वारकरी यांना या सेवेचा खूप लाभ झाला असल्याने हायकोर्टाचे प्रसिद्ध वकील अॅड. विश्वनाथ टाळकुटे यांनी धन्यवाद मानले आहेत
माऊली फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध सेवा शिबिरासाठी आपले नेहमीच सहकार्य मिळत आले आहे.
संस्थेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावरील आषाढी वारी सेवा शिबिरे 2825 च्या कार्यक्रमांस यावर्षी दि. 28 जून ते 2 जुलै 2025

( फलटण ते वेळापूर दरम्यान) वारकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवेत सुलभता येण्यासाठी आपणा कडून संस्थेला जी “पोरे रूग्णवाहिका” उपलब्ध करून दिल्याने वारकऱ्यांना व स़ंस्थेला खूप उपयोग झाला आहे. या रूग्णवाहिकेचे चालक श्री. बाळासाहेब सांगावे यांनी चालक म्हणून चांगली सेवा तर दिलीच त्या उपर त्यांनी उर्वरित वेळेत असंख्य वारकऱ्यांच्या पायांना मालिश करून जी सेवा दिली ती खरोखरच उल्लेखनीय व अभिनंदनीय होती, त्यांना व आपणास संस्थेच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. आपल्या कडून भविष्यातही असेच सहकार्य मिळत राहो अशी मागणी माऊली फाउंडेशन मुंबई अँड. विश्वनाथ टाळकुटे यांनी केली आहे.