म्हसवड (दि. ३ वार्ताहर)-
मी हिंदु धर्म सोडुन ख्रिचन धर्म स्विकारला असुन हा धर्म स्विकारल्यापासुन माझ्या सर्व अडचणी नष्ट झाल्या आहेत,
धर्मांतरण

तुम्हीही हिंदु धर्म सोडुन धर्मांतरण करा तुमच्या घरी भरपुर आर्थिक सुलभता येईल असे आमिष दाखवणार्या महिलेच्या विरोधात म्हसवड पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत म्हसवड पोलीस स्टेशन कडुन समजलेली अधिक माहिती अशी येथील धनाजी गोपालकृष्ण माने हे आपली पत्नीसोबत माळी गल्ली म्हसवड येथे राहतात, त्यांच्या शेजारी श्रीमती सविता दत्तात्रय जाधव ही महिला रहावयास आहे. सदर ची महिला ही घराशेजारी रहावसास असल्याने आमच्या ओळखीची आहे, याच ओळखीतुन संबधित महिलेने तुमच्याकडे काम आहे असे म्हणत आमच्या घरी बुधवार दि.२ रोजी आल्या, आमच्या घरी आल्यानंतर त्यांनी आम्हा नवरा बायकोला असे सांगितले की मी हिंदु धर्म सोडुन ख्रिचन धर्म स्विकारला आहे हा धर्म स्विकारल्यापासुन माझे चांगले झाले असुन या धर्मामुळेच माझा बेपत्ता झालेला मुलगाही घरी परतला आहे. हिंदु धर्म हा अतिशय खोटा असुन या धर्माचे देव, देवता हे सैतान आहेत, तुम्ही ख्रिचन धर्म स्विकारला नाही तर तुमचे वाटोळे होईल असे म्हणत आमच्या घरी लावलेले देव, दैवतांचे फोटो काढुन टाका त्यांची पुजा करु नका, पुजा करावयाचीच असेल तर येशुची करा असे म्हणत संबंधित महिलेने सोबत आणलेल्या पिशवीतुन एक बाटली काढली व त्यातील पाणी आमच्या अंगावर व घरात इतरत्र शिंपले, यावर मी त्यांना असे करु नका असे म्हणालो असता त्यांनी आम्हाला शांत रहा असे म्हणत जेरजोरात प्रार्थना म्हणण्यास सुरुवात करुन आम्हालाही त्यांच्यासोबत म्हणण्यास सांगु लागली आम्ही प्रार्थना म्हणण्यास नकार दिल्यावर त्यांनी आम्हाला ख्रिचन धर्माच्या वह्या व पुस्तके दाखवत हाच धर्म अतिशय चांगला व खरा आहे असे सांगत हिंदू धर्म हा खोटा असल्याचे सांगत आमच्या धर्माबद्दल अतिशय आक्षेपार्य बोलुन आमच्या व आमच्या धर्माच्या भावना दुखावल्या असल्याची फिर्याद धनाजी माने यांनी म्हसवड पोलीसांत दिली असुन सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निता पळे ह्या करीत आहेत.