
म्हसवड वार्ताहर
मी राजमाता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चा पाईक आहे. असे विचार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
डॉ वसंत मासाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
मासाळवाडी म्हसवड येथे नुकत्याच पार पडलेल्या अहिल्यादेवी जयंती कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मासाळवाडी येथे आपल्या मार्गदर्शनामध्ये राजमाता अहिल्यादेवी आणि सध्याची राजकीय, सामाजिक न्यायिक परिस्थिती कशी आहे याची माहिती सर्वसमाज बांधवांना सांगितले. अहिल्यादेवींनी जगाला आदर्श घालून दिला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्या शिवभक्त होत्या. शिवाजी महाराजां प्रमाणे त्यांनी सुशासन चालवले.300 वर्षांपूर्वी पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना अहिल्यादेवीने चालू केली.न्यायव्यवस्था हे आदर्शवत असली पाहिजे, सर्वसामान्य नागरिकांना जीवनात समान जीवन जगता आले पाहिजे, कोणावरती अन्याय झाला नाही पाहिजे अशा पद्धतीची अहिल्यादेवींनी आपल्याला शिकवण दिली.
*मासाळवाडीतील युवकांनी एका छोट्याशा गावामध्ये सुद्धा अतिशय सुंदर असं स्मारक अहिल्यादेवी चे उभा केलेले आहे त्या सर्वांचे मी मनापासून कौतुक करतो. राजमाता पुण्यश्लोक *अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक म्हसवड मध्ये साकार होत आहे त्याचे काम त्वरित चालू करण्याचे आदेशचं त्यांनी मुख्यधिकारी यांना दिले.पुढच्या* वर्षीची जयंती म्हसवड मध्ये भव्य अशी करण्याचा मानस मंत्री जयकुमार गोरे यांनी बोलून दाखवला.
गावातील विकास कामाविषयी डॉ.वसंत मासाळ यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे ती योग्य आहे,लवकरच प्रत्येक विकास कामांमध्ये विषयी एक सकारात्मक भूमिका घेऊन नक्की या म्हसवड नगरीमध्ये असणाऱ्या मासाळवाडीचा कायापलट करण्याचा निश्चय आपण करत आहोत. मासाळ वाडी मध्ये सर्वात मोठ्या अडचण शेतीसाठी पाणी परंतु मी आज आपल्याला शब्द देतो की जेव्हा मासाळवाडीच्या तलावतील पाणी कमी होईल त्यावेळी तात्काळ पाणी पोहोचेल अशी सोय आपण केलेली आहे.रस्त्याची व्यवस्था आपण लवकरच सुरू करत आहोत. एम आय डी सी मध्ये शेतकऱ्यांची बागायत जमीन घेतली जाणार नाही आणि जी जमीन जाईल तिचा मोबदला चांगला मिळवून देणार असाही शब्द दिला.
या कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांच्या अडचणी सोडवणाऱ्या सौ सोनियाताई गोरे वहिनी साहेब,माजी नगराध्यक्ष नितीन भाई दोशी,आप्पासाहेब पुकळे,म्हसवड नगरीचे मुख्याधिकारी डॉ सचिन माने साहेब,शशिकांत गायकवाड, प्रशांत गोरड,विजय धट,विजय बनगर,कृष्णा मदने,रामभाऊ कोडंलकर,मासाळ वाडी गावचे माजी उपनगराध्यक्ष नारायण मासाळ,सुखदेव मासाळ, शिवाजी मासाळ उपस्थित होते तसेच उद्यान समितीचे सचिव अमोल ठोंबरे अध्यक्ष डॉ. सतीश मासाळ, सर्व सदस्य. तसेच अहिल्यादेवीच्या चरित्र विषयी माहिती देणारे हेडम कादंबरीचे लेखक नागू वीरकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने युवक वर्ग,गजी मंडळातील गजी,महिला उपस्थित होते,सर्वांनी अहिल्यादेवीला अभिवादन केले.सर्व मान्यवरांनी ग्रामस्थानी
डॉ वसंत मासाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या.