गोंदवले – सातारा जिल्हा माण तालुक्यातील आदर्श प्राथमिक शाळा लोधवडे या ठिकाणी शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ निमित्त नवागत विद्यार्थ्यांनांचे शाही स्वागत करण्यात आले.या प्राथमिक शाळेचे उपक्रमशील व हर हुन्नरी शिक्षक सतेशकुमार मारुती माळवे व दिपक जगन्नाथ कदम यांच्या खास संकल्पनेतून व मुख्याध्यापक एम. डी. ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवागत विद्यार्थ्यांनाचे एका मोठ्या रथातून तुरेबाज फेटे परिधान करीत कपाळी कुंकूम तिलक लावून वाद्यांच्या ढोल ताशांच्या गजरात मान्यवर पाहुण्यांच्या साक्षीने ऐटीत व मोठ्या थाटामाटात लोधवडे गावी एका मोठ्या रथातून नवागत विद्यार्थ्यांन्यांची शाही मिरवणूक काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनांच्या वरती पुष्पवृष्टी करून शाळेच्या पहिल्या दिवशी पावलांचे ठसे उमटवून त्यांना फुलांच्या पायघड्यातून ,औक्षण करून, सनईच्या गोड मंजूळ स्वरात त्यांच्या हाती गुलाब पुष्पे देऊन शाळेत प्रवेशित केले.
या वेळी शाळेत फुग्यांची पाना फुलांची सुंदर आरास करण्यात आली होती.शाळेत गुढी तोरणे उभारण्यात आली होती. मन मोहक रांगोळी काढण्यात आली होती.शाळेतील पहिले पाऊल अशा स्वरुपाचे सुंदर सचित्र बॅनर लावले होते.नवागत विद्यार्थ्यांनासाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता.शाळेच्या पहिल्याच दिवशी अतिशय उत्साही प्रसन्न आणि आनंददायी वातावरणात नवागत विद्यार्थ्यांनाचे जबरदस्त असे स्वागत करण्यात आले.सर्व मुले,पालक व पाहुणे आनंदून गेले. गाव आणि शाळा परिसरात एक शैक्षणिक माहोल व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.शालेय परिसर विद्यार्थ्यांनाच्या किलबिलाटाने गजबजून गेला.
या शुभ प्रसंगी एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत शालेय परिसरात विविध प्रकारच्या अनेक झाडांचे उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. विद्यार्थ्यांना नवीन पाठयपुस्तके, कपडे व बुटांचे मोफत वाटप करण्यात आले.
अशा मंगलदिनी प्रमुख मान्यवर पाहुणे उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने लोधवडे गावचे सरपंच निवास काटकर, शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष कुंडलिक चोपडे, उपाध्यक्ष सर्जेराव कांबळे,माजी अध्यक्ष राजकुमार माने,सदस्य सुषमा चोपडे, राहुल नष्टे, रेश्मा शिलवंत, तनुजा जगताप तसेच विजय माने महाराज,श्रीकांत काळोखे, विजय माने याशिवाय या नवागत विद्यार्थी उत्सव कार्यक्रमासाठी अपार मेहनत घेणारे लोधवडे शाळेचे सर्व आदर्श गुरुजन यामध्ये मुख्याध्यापक महादेव ननावरे, सह.शिक्षक दिपक कदम ,सतेशकुमार माळवे,सुचिता माळवे ,संध्या पोळ,दिपाली फरांदे,मनिषा घरडे, अश्विनी मगर,अंगणवाडीताई अर्चना माने,सुरेखा जाधव,पूनम अवघडे, पुष्पा जाधव,विद्या पोळ,सर्व अंगणवाडी मदतनीस तसेच अनेक पालकवर्ग,ग्रामस्थ बंधू-भगिनींनी या कार्यक्रमासाठी आवर्जून आपली उपस्थिती लावली होती. यावेळी अध्यक्ष,उपाध्यक्ष ,विजय माने महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सतेशकुमार माळवे सरांनी केले तर आभार मुख्याध्यापक ननावरे सरांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.शेवटी मुलांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.या दिवशी दुपारी सर्व विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात गोड जिलेबी व मसाला भाताचे स्वादिष्ट जेवणही देण्यात आले.सध्याला या आगळ्या वेगळ्या विद्यार्थी नवागतांच्या स्वागत उपक्रमाचे सर्वच स्तरातून भारी कौतुक होत आहे. माण तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मा.लक्ष्मण पिसे,पिंपरी केंद्रप्रमुख मा.शोभा पवार यांनी लोधवडे शाळेचे खास करून अभिनंदन केले.
छाया – नवागत विद्यार्थ्यांचे रथातून मिरवणूकीने शाळेत प्रवेश करताना मान्यवर पाहुणे.
