जागृत ग्राहक राजा संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य विक्रम शिंदे, महिलाध्यक्षा ऍड शीतल साळुंखे -पाटील, संघटक प्रकाश शिंदे तर सचिव प्रा. सतीश जंगम
वडूज, दि 16 ( प्रतिनिधी )
ग्राहक चळवळीत अग्रणी असलेल्या जागृत ग्राहक राजा, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी प्राचार्य विक्रम शिंदे ( मसूर), महिलाध्यक्ष पदी ऍड शीतल साळुंखे – पाटील ( वडूज ), संघटक पदी प्रकाश शिंदे ( मोरगिरी – पाटण ) व सचिव पदी प्रा. सतीश जंगम ( फलटण ) यांची एकमताने निवड करण्यात आली.
. नुकतीच संस्थेचे राज्य अध्यक्ष दिलीप पाटील यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी पदाधिकारी निवडण्यात आले. यावेळी राज्य संघटक दिलीप फडके, सचिव प्रा नागनाथ स्वामी, कोषाध्यक्ष विद्याधर कुलकर्णी व पदाधिकारी उपस्थित होते. या निवडी बद्दल ग्राहक चळवळीतील मान्यवरांनी अभिनंदन केले.
