म्हसवड दि.२६
“सिध्दनाथाच्या नावानं चांगभल”च्या जयघोषात मानक-यांच्या व भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीचा रथ जाड दोरखंडाच्या साह्याने रथगृहातून बाहेर काढुन रथ मिरवणुकीसाठी सज्ज करण्यात आला.
दिपावली पाडव्यास पारंपारिक पध्दतीने श्री. सिध्दनाथ माता जोगेश्वरीचा शाही विवाह सोहळा उत्सवाचा प्रारंभ झाला असुन श्रींच्या उत्सव मुर्तींना हळदी लावणे, त्यानंतर तुलशी विवाहच्या मध्यरात्री विवाह सोहळा व विवाहा नंतर होणा-या देवदिवाळीस वधु-वराची वरात म्हणेजच रथ मिरवणुकीने या शाही विवाह सोहळ्याची सांगता होणार असुन या रथोत्ससवासाठी गेली वर्षषभर रथगृहात बंद असलेला श्रींचा रथ हा आज कार्तिक एकादशी दिवशी रथगृहातून बाहेर काढण्यात आला.
रिंगावण पेठ मैदानातून विराजमान झालेला श्रींचा रथाची संपुर्ण नगरप्रदक्षिणा केली जाते हा रथ भाविक जाड दोरखंडाच्या साह्याने श्रींचा रथ हाताने ओढीत मार्गस्थ करतात यावेळी. उपस्थित भाविक गुलाल-खोब-याची उधळण करत असतात. नारळाची तोरणे नवसाची रंगबिरंगी निशाणे रथावर बांधण्यास भाविकांची झुंबड उडते या रथयात्रेची सुरवात मानकरी राजेमाने यांच्या राजवाड्यातून होते या रथोत्सवाच्या आदल्या दिवशी आमावस्येला रथाचे कळस व मानाची वस्त्रे रथावर चढवली जातात व रथोत्सवाच्या दिवशी सकाळी श्रींचा नैवद्य व सिंहासन हे राजेमाने मानक-यांच्या राजवाड्यातून मंदिरात जाते व तेथूनच ते सिंहासन व नैवद्य यात्रा पटांगणावरील रथामध्ये नेला जातो व मानक-यांच्या उपस्थितीत मंदिरातून श्रींच्या उत्सव मुर्ती पालखीतून रथापर्यंत नेल्या जातात यावेळी भाविक गुलाल खोब-यांची उधळण करतात हि पालखी रथाजवळ आल्यानंतर मानकरी राजेमाने यांच्या उपस्थितीतच श्रींच्या उत्सव मुर्ती रथामध्ये विराजमान केल्या जातात व परंपरेनुसार या रथामधिल श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या मुर्तीचे पुजन करून रथाचे पुजन करून रथ मार्गस्त करून रथोत्सवास प्रारंभ होतो हि रथ प्रदक्षिणा म्हसवड शहराला उजवी नगरप्रदक्षिणा घालुन पुन्हा रथ यात्रा पटांगणावर येतो यावेळी या रथावर राजेमाने यांचा मान असतो तर हा रथ ओढण्याचा मान हा येथिल माळी समाजाचा असुन या रथाची देखभाल व दुरूस्ती करण्याचा मान लोहार व सुतार समाजाचा आहे तर इतर बारा बलुतेदारांचा मान या रथोत्सवात असतो.
यावेळी श्रीमंत गणपतराव राजेमाने, श्रीमंत प्रतापसिंह राजेमाने, श्रीमंत अँड.पृथ्वीराज राजेमाने, श्रीमंत तेजसिंह राजेमाने, श्रीमंत दिपसिंह राजेमाने, श्रीमंत विश्वजित राजेमाने, श्रीमंत सयाजीराजे राजेमाने आदी मानकरी व माळी, लोहार, सुतार, व बारा बलुतेदार मानक-याच्या उपस्थितीत रथ रथगृहातुन बाहेर काढून नगर प्रदक्षिणा साठी सज्ज करण्यात आला असुन २ डिसेंबर रोजी देवदीपावली दिवशी हा रथोत्सव होणार आहे.

चौकट –
रथ बाहेर आल्यानंतर त्याच्या शृंगाराची तयारी –
श्री. च्या लग्नाची वरात म्हणजे रथोत्सव असे मानले जाते, श्रींच्या लग्नाच्या वरातीसाठी श्रींच्या रथालाही सजवले जाते, त्यासाठी येथील माळी रमाजाकडुन संपुर्ण रथाची स्वच्छता केली जाते, त्यानंतर त्यास सुबक व आकर्षक अशी चौफेर झालर लावली जाते, त्यानंतर त्यावर निशान लावले जातात.
फोटो –