अवघ्या ५ तासात लोणंद पोलिसांनी काढले अल्पवयीन मुलीला शोधून

Spread the love

लोणंद प्रतिनिधी दिलिप वाघमारे

लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील १४ वर्षाची अल्पवयीन मुलीला तिचे वडील मोबाईल फोन जास्त वापरते म्हणून रागावून मोबाईल काढून घेतला म्हणून दि ३ रोजी सकाळी ०६.०० वाजता शाळेत लवकर बोलावले आहे म्हणून सदर मुलगी घरातून निघून गेली होती. दुपार झाली तरी अद्याप ती घरी न आलेने तीचे वडीलांनी लोणंद पोलीस स्टेशन येते धाव घेवून पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांना सदरची हकीकत सांगितली. पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी सदर घटनेचे गांभिर्य ओळखून तात्काळ प्रभारी अधिकारी सुशील भोसले यांना कळवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केली. त्या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी तांत्रीक बांबींच्या आधारे सदर मुलगी ही आळंदी ता. खेड जि. पुणे येथे असलेबाबत खात्रीशीर माहीती मिळविली व आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना मुलीचा फोटो व वर्णन मोबाईलवर पाठविले. त्यानंतर पोलीसांनी आळंदी परीसरात शोध मोहीम राबवून सदरची अल्पवयीन मुलगी ही त्याठिकाणी मंदिरात बसलेली मिळून आली. तिला आळंदी येथून ताबेत घेवून लोणंद येथे येवून तिच्या आई वडीलांच्या ताब्यात देवून घरातून निघून गेलेली अल्पवयीन मुलगी तांत्रीकदृष्ट्या तपास करून ५ तासांत शोधण्यात पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम व त्याचे दफ्तरी पो.कॉ. सनिल नामदास यांनी यश मिळविले. सदरची कामगिरी समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा, वैशाली कडूकर मॅडम अपर पोलीस अधिक्षक सातारा, राहुल धस, उपविभागिय पोलीस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुशील भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक तपासी अधिकारी विशाल कदम, पोउपनि घुले, पो.कॉ. सनिल नामदास, मपोकॉ. भारती मदने यांनी कारवाईत भाग घेतला आहे. मा. पोलीस अधिक्षक सातारा यांनी त्याबाबत लोणंद पोलीस स्टेशनचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!