पंढरपूर (रामेश्वर कोरे)—
पंढरपूर येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था या पदावर नियुक्त झालेल्या प्रशासकीय अधिकारी योगिता मुरडे यांचा पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन श्री.सतीशजी मुळे व सौ.माधुरीताई जोशी यांचे हस्ते बँकेची शतसुधा ही स्मरणिका भेट देऊन स्वागत केले.यावेळी बँकेचे संचालक अनिल अभंगराव, शांताराम कुलकर्णीसर, अमित मांगले, व्यंकटेश कौलवार, प्रभूलिंग भिंगे, गणेश शिंगण, गजेंद्र माने, हृषीकेश उत्पात, अनंत कटप, सुनील डोंबे, संचालिका सौ.संगीताताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, राजेश आगवणे, गणेश हरिदास, पेंडाल आदि बँकेतील अधिकारी वर्ग तसेच सहायक निबंधक कार्यालयातील पी.बी.सावंत, सहकार अधिकारी श्रेणी-१ व एस.एस.सांगोलकर, सहकार अधिकारी श्रेणी-२ उपस्थित होते.बँकेचे चेअरमन श्री.सतीशजी मुळे यांनी बँकेची स्थापने पासून सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी तसेच पंढरपूर येथील जडणघडणीत स्व.सुधाकरपंत परिचारक व सध्या मा.आमदार प्रशांतराव परिचारक यांचे मार्गदर्शनाखाली बँकेचे केलेले कामांची माहिती दिली. यावेळी सहाय्यक निबंधक योगिता मुरडे यांनी बँकेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेत समाधान व्यक्त करीत काही महत्वपुर्ण सूचनाही दिल्या. भविष्यात पंढरपूर परिसरातील सर्वच सहकारी संस्थांचे अडचणीचे प्रश्न मार्गी लावणेबाबत त्यांनी आश्वासन दिले. तसेच बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
