
पिंगळी गोंदवले परिसरात पाऊसाने मोठं नुकसान
पिंगळी मध्ये आठ ते दहा घरात पाणी घुसून मोठं नुकसान
पिंगळीत वृक्ष पडल्यामुळे पिंगळी दहिवडी वाहतूक ठप्प
गोंदवले –
सातारा- लातूर या राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या आडमुठ्यापणा मुळे पिंगळी बुद्रुक येथील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या घरातील जीवनोपयोगी वस्तू पाण्यात भिजून नासाडी झाली आहे. याकडे प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे नागरिक आक्रमक झाले लवकरच या संदर्भात रस्त्यावर उतरणार असल्याचं नागरिकांनी सांगितलं
आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास गोंदवले पिंगळी परिसराला अचानक जोरदार पावसाने झोडपून काढले.या पावासाने पिंगळी व सत्रेवाडी याठिकाणच्या आठ ते दहा घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. संबंधित मेघा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने रस्ता पूर्ण केल्यानंतर त्या रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गटर करणे आवश्यक होते मात्र तशी व्यवस्था न केल्यामुळे पाणी लोकांच्या घरात घुसले पिंगळजाई आणि सूतगिरण या दीड किलोमीटरच्या परिसरातून हे पाणी या ठिकाणी वाहून येतं आजही त्याच पद्धतीने हे पाणी आलं आणि लोकांच्या घरामध्ये शिरून घरातील जीवनाशक वस्तू या पाण्यात भिजून गेल्या याबाबत स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतकडेही समस्या मांडली होती मात्र ग्रामपंचायतीने याकडे कोणताही पद्धतीचा मार्ग काढला नाही
काँक्रीट रस्ता बनवताना अनेक नागरिकांनी व स्थानिक रहिवाशांनी याबाबतची समस्या संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांच्याकडे कर्मचाऱ्यांच्याकडे मांडली मात्र नागरीक व शेतकरी यांना दमदाटी करुन आपली कामे मनमानी पद्धतीने पूर्ण करून घेतलं आणि आज या कंपनीचे कोणीही अधिकारी कर्मचारी याकडे फिरकत नाहीत याच दरम्यान पिंगळी दहिवडी रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या समोर असणाऱ्या महाकाय झाड वाऱ्यामुळे उमळून पडले व यामुळे दहिवडी कडे जाणारी वाहतूक बंद झाली ही वाहतूक खांडसरी चौका मार्गे दहिवडीकडे सुरू होती दरम्यान गोंदवले खुर्द येथे आज मोठा पाऊस झाला या पावसात ताराचंद पोळ सतीश पोळ भाऊसो पोळ सुरेश पोळ राजू पोळ मधुकर पोळ यांच्या घरामध्ये रस्त्यावरील पावसाचे पाणी शिरून त्यांचंही घरातील जीवनाश्मक वस्तूंचे नुकसान झालं गेल्या दोन तीन वर्षापासून संबंधित ग्रामस्थ याबाबत ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करत आहेत मात्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आज पुन्हा एकदा त्यांच्या घरात पाणी शिरूर मोठं नुकसान झालं
छाया – गोंदवले खुर्द व पिंगळी येथे घरात पावसाचे पाणी
