(अजित जगताप)
सातारा दि: महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार सत्तेत आहे. शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पर्यंत तलाठी माहिती देत नसल्याची थेट तक्रार एका वकिलाने दूरध्वनीद्वारे केली. विशेष म्हणजे पत्रकारांच्या समोरच या तक्रारीचा संवाद मोठ्या मनाने पालकमंत्र्यांनी उघड केला.
सातारा जिल्ह्यामध्ये प्रशासकीय कारभार म्हणजे असून अडचण…. नसून खोळंबा… असाच आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रशासनाला रान मोकळे मिळाले आहे. याचा पुरेपूर लाभ घेतला जात आहे. सातारा जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयासमोर अनेक अन्यायग्रस्त न्यायासाठी आंदोलन करतात. परंतु, त्याची गंभीर दखल घेतली जात नाही. उलट उपोषण सोडवण्यासाठी प्रवृत्त केले जाते. ही बाब लोकशाहीला घातक असली तरी कुणावरही अद्याप कारवाई झालेली नाही. सर्व काही अलबेला असल्याचेच वर वर दिसून येत आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन तर केबिन मध्येच देवाच्या काठीला आवाज नसतो. याची प्रचिती पाहण्यास मिळाली .गुरुवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता सातारा जिल्हअधिकारी कार्यालयाच्या केबिनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. नेहमीप्रमाणे पालकमंत्री शंभूराज देसाई पत्रकार परिषदेसाठी अर्धा तास उशीर आले. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये पर्यटन विकास या बाबत माहिती दिली. पत्रकारांनी आवश्यक व अनावश्यक विचारलेल्या प्रश्नांनाही चांगल्या पद्धतीने उत्तर दिले. अचानक सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरध्वनीची बेल वाजल्यानंतर पालकमंत्र्यांनी दूरध्वनी उचलला.
मलकापूर तालुका कराड येथील सर्वे नंबर 281२८१/१४ या जमिनी बाबत तलाठी माहिती देत नाही. म्हणून अँड एस. पी. शहा यांनी मोठे धारिष्ट दाखवून थेट सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात फोन केला. नवलाईची गोष्ट म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमध्ये त्यांच्या केबिनमध्ये दूरध्वनीची बेल वाजल्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी फोन उचलला. त्यावेळेला अँड शहा यांनी कमी शब्दात पण महसूल विभागाबाबत मोठी गाऱ्हाणी मांडली. संबंधित मलकापूर तलाठ्याची थेट तक्रार पालकमंत्र्यांनी ऐकून घेतली व तत्परतेने काम करण्याची सूचना शेजारी उभ्या असलेल्या दोन स्वीय सहाय्यक दिली. त्यांनी सुद्धा तातडीने माना हलवून प्रतिसाद दिला.
सातारा जिल्हा पालकमंत्र्यांपर्यंत तक्रार सांगताना पत्रकार सुद्धा साक्षीदार होते. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाचा कारभार तसेच महसूलचा कारभार कशा पद्धतीने चाललेला आहे? याचीच चुणूक पाहण्यास मिळाली.
सुदैवाने साताऱ्यात विरोधी पक्ष अस्तित्वात नसल्यामुळे जाब कोणी विचारायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु पालकमंत्र्यांनीच समस्यांबाबत थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील केबिन मधील दूरध्वनी उचलल्यामुळे एक लपवण्यात आलेली बातमी पत्रकारांसमोरच उघड झाली. याचे मात्र अनेकांना समाधान वाटले. जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेबाबत नागरिकांमध्ये असंतोष आहे. दुर्दैवाने त्याची कुठेही वाचत होत नाही. करण पालकमंत्र्यांकडे झेड सुरक्षा असल्यामुळे कोणीही जाब विचारत नाही. परंतु पालकमंत्र्यांनीच सत्य समोर आणले आहे. याबद्दल जनतेने त्यांना धन्यवाद दिले आहेत. दरम्यान हा प्रकार उघडकीस आला त्या वेळेला सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते. भविष्यात पालकमंत्री त्यांच्या केबिनमध्ये बसल्यानंतर अशाच तक्रारी कनिष्ठ अधिकाऱ्यांबाबत विचारण्याची शक्यता आता बळवली आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या केबिन मधून तक्रारदाराशी संवाद साधताना पालकमंत्री शंभूराज देसाई
(छाया– अजित जगताप सातारा)
