म्हसवड.. प्रतिनिधी
म्हसवड येथील सहकार गणेश मंडळ येथे क्रांतिवीर शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांनी गणेश उत्सव साक्षरता प्रबोधन उपक्रम राबवून सामाजिक कार्याचा एक वेगळा ठसा निर्माण केला.
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर , शिक्षक तुकाराम घाडगे यांनी शाळेतील विद्यार्थ्यासमवेत पोलीस स्टेशन नदीच्या सहकार गणेश मंडळास भेट देऊन प्रबोधनात्मक आगळे वेगळे उपक्रम सादर केले.
उल्लास संगे साजरा करूया गणपती
उत्सव या उपक्रमा अंतर्गत क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवड च्या विद्यार्थी ,शिक्षक व मुख्याध्यापकांनी सहकार गणेश मंडळ म्हसवड या ठिकाणी जाऊन साक्षरता स्टॉल उभारला. घोषवाक्य तसेच घोषणांच्या माध्यमातून प्रबोधन केले. तसेच निरक्षरांना साक्षर करण्याचा ध्यास शाळेतील स्वयंसेवक व शिक्षकांनी घेऊन साक्षरताचा धडा गिरवला.
मंडळातील सर्व सदस्यांना साक्षरता विषयी प्रचार व प्रसार करावयास सांगितले. क्रांतिवीर नागनाथांना नायकवडी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तुकाराम घाडगे ,मुख्याध्यापिका सौ.सुलोचना बाबर यांनी साक्षरता विषयक बोर्ड लावून एक पथनाट्य सादर केले. यानिमित्ताने उल्हास संगे गणपती उत्सव साजरा केला.
या कामी सहकार गणेश मंडळ मंडळाचे अध्यक्ष आयन शेख ,सलमान मुल्ला व इतर सदस्यांनी सहभाग घेतला.यावेळी आपला देश 100% साक्षर होण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे व विद्यार्थ्यांनी प्रत्येक शेजारील एक निरक्षकास शोधून त्यांना धडे गिरवण्याबाबतच्या सूचना मुख्याध्यापकांनी दिल्या.अजूनही आपल्या देशामध्ये असाक्षर लोक सापडतात. प्रत्येक जण साक्षर झालाच पाहिजे हे आपल्या एआय जमान्यात खूप गरजेचे आहे हे विद्यार्थ्यांना सुलोचना बाबर यांनी समजावून सांगितले.
उदाहरणांच्या माध्यमातून आपण असाक्षर लोकांना साक्षर करण्याचा ध्यास घेण्याचा संदेश विद्यार्थी व गणेश मंडळ सभासदांना दिला. यावेळी तुकाराम घाडगे यांनी सहकार गणेश मंडळाचे अध्यक्ष आयान शेख यांचा शाळेच्या वतीने सत्कार केला तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपस्थितांचे आभार सलमान मुल्ला यांनी व्यक्त केले. संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, सर्व पालक प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील अनेक
मान्यवरांनी क्रांतिवीर शाळेच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
क्रांतिवीर शाळेतर्फे सहकार गणेश मंडळ म्हसवड येथे सामाजिक कार्याचे प्रबोधन करताना मुख्याध्यापिका सुलोचना बाबर
