एचएनडी गुरुकुल गैरविक्री प्रकरणावर पंढरपूरात जैन समाजातर्फे निषेध मोर्चा

Spread the love

सेल डीड रद्द होईपर्यंत लढा सुरूच— जैन समाजाचा निर्धार पंढरपूरात दुचाकी रॅली व निवेदन सादर

पंढरपूर,दि.२८/१०/२०२५- पुणे येथील एचएनडी गुरुकुल अपारदर्शक विक्री संदर्भात व त्याच्या निषेधार्थ मंगळवारी येथील जैन सोशल ग्रुप आणि सकल जैन समाज यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे मोटारसायकल रॅली काढण्यात आली.त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट Seth Hirachand Nemchand Smarak Trust Established on Date-2/8/1954 Public Charity Trust- Reg. No. PTR E-1634 (Mumbai). या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने लबाडीपूर्वक धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र शासन यांना खोटी व चुकीची माहिती सादर करत पब्लिक विश्वस्त संस्थेची पुणे येथील मॉडेल कॉलनी परिसरातील तीन एकर जागा चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने विक्री करून टाकली. देशाच्या इतिहासात प्रथमच प्रतिष्ठित जैन मंदिर है विक्री झाले व गहाण टाकत त्याचे पावित्र्य धोक्यात आणले आहे.संस्थेच्या परिसरात १००८ श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर जे ६५ वर्षे जुने आहे त्याचे अस्तित्वच डावलण्यात आले.विहीर ही दाखविण्यात आली नाही.

त्यामुळे एचएनडी गुरुकुल गैर विक्री संदर्भात संपूर्ण राज्यातील जैन समाज आक्रमक झाला आहे.निषेधार्थ राज्यभर मूकमोर्चा, दुचाकी रॅली काढून निवेदन देण्याची मोहीम महाराष्ट्र राज्यासह देशभरात सुरू झाली आहे.

त्याचाच भाग म्हणून पंढरपूर येथेही जेष्ठांसह युवकांनी सहभागी होत उपविभागीय कार्यालयपर्यंत महावीर नगर येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पासून दुचाकी रॅली काढण्यात आली.

उपविभागीय कार्यालयात नायब तहसिलदार यांनी उपविभागीय अधिकारी यांच्यावतीने निवेदन स्विकारले आणि समाजभावना वरिष्ठांच्या पोहोचवणार असल्याचे सांगितले.समाजाच्यावतीने सीए रोहन कोठाडिया, उज्वल दोशी यांनी या निवेदनाविषयी माहिती देत निषेध नोंदवला.  हे सेल डीड रद्द होईपर्यंत हा लढा चालू ठेवण्याचे आवाहन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले.

यावेळी जैन सोशल ग्रुप आणि सकल जैन समाजाच्यावतीने या रॅलीचे नियोजन करण्यात आले होते.यावेळी सर्वांनी हे सेल डीड रद्द होईपर्यंत हा लढा चालू ठेवत  एकत्रित लढा देण्याचे जाहीर केले.या सर्व प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्या वरती तातडीने फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा यासाठी समाजाच्यावतीने मागणी करण्यात आली.

राष्ट्रीय काँग्रेसचे पंढरपूर शहर अध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर यांनी पाठिंब्याचे पत्र उपविभागीय अधिकारी यांना दिले आणि लढ्यासाठी पाठिंबा जाहीर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!