इंजिनिअर सुनील पोरे यांचा दावा खरा ठरला,म्हसवडकरांचा प्रतिसाद

Spread the love

इंजिनीयर सुनील पोरे यांच्या आवाहनाला म्हसवड करांचा प्रचंड प्रतिसाद

म्हसवड वार्ताहर

नाही जिल्हाध्यक्ष इंजिनीयर सुनील पोरे यांनी दिलेल्या शब्दाला म्हसवड करांचा प्रतिसाद मिळाला असल्याचे मत नामदेव शिंपी समाजाचे कार्यकर्ते वैभव पोरे यांनी व्यक्त केले आहे.
आनंदीबाई हॉल येथील प्रचार सभेत इंजि. सुनील पोरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर विश्वास व्यक्त करत म्हसवडमधून जयकुमार गोरे यांना किमान 5 हजार 500 पेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देऊ, असे विधान केले होते.
हे विधान त्यांनी निकालानंतर अचूक ठरवले. आ. गोरे यांनी 10,807 मते मिळवली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी घार्गे यांना केवळ 4,472 मते मिळाली. निकाल जाहीर झाल्यानंतर सुनील पोरे यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधत म्हसवडमधील जनतेचा विश्वास आणि सर्वांची मेहनत पक्षाने घेतलेली धडपड यामुळेच हा विजय शक्य झाला. हा विजय म्हणजे लोकशाहीचा आणि विकासाच्या
राजकारणाचा विजय असल्याचे सांगितले. तसेच या विजयामुळे भाजप पक्षाला आगामी निवडणुकीसाठी बळ मिळाले आहे.
विशेषतः म्हसवडसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघात ही कामगिरी पक्षासाठी एक प्रेरणादायी टप्पा ठरली आहे. जयकुमार गोरे यांचा विजय हा पक्षासाठी भविष्यातील राजकीय योजनांसाठी बळकटी मिळवून देणारा ठरणार आहे. म्हसवडमधील हा विजय लोकशाहीच्या उत्सवाचे प्रतीक असल्याचेही पोरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!