औंध प्रतिनिधी -ओंकार इंगळे
औंध गाव हे एतिहासिक गाव म्हणून ओळखले जाते पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण मानले जाते औंध मध्ये शाळा कॉलेज याकरिता शिक्षण घेण्यासाठी बाहेरून विद्यार्थी येत असतात औंध गावची बाजारपेठ ही सुद्धा मोठी आहे असे असताना शौचालयाची व्यवस्था नसल्याकारणाने औंध मधील व्यापारी वर्गाला दुकानदार तर औंध ग्रामस्थांना नाहक त्रास होत असल्याचे दिसत आहे .

औंध गाव एकूण सोहळा ते सतरा गावांना तर वाड्या वस्त्यांना जोडलेले गाव आहे मानवी शरीरातील नैसर्गिक होणाऱ्या क्रिये ला अडवता येत नाही परंतु शौचालयाचे सोय नसल्याकारणाने औंध मधील व्यापारी ग्रामस्थ हे भलतेच वैतागलेले दिसत आहेत आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या लालसाने का होईना शौचालयाची सोय होईल का अशी चर्चा औंध ग्रामस्थान मध्ये व व्यापाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात होत असताना दिसत आहे.