म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई
म्हसवड परिसरातून मुक्या जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या आरोपीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफ सह 19 जर्सी खोंडे आणि वाहनासह ताब्यात घेऊन तब्बल 7 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त
सविस्तर हकीकत
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दत्ता तुकाराम शिंदे हा एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडी क्रमांक एम एच 11 बी एल 4193 मधून कत्तलीसाठी काही गोवंश जनावरे भरून मल्हार नगर म्हसवड येथील बेघर वस्ती येथून मसवड मार्गे जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ स्टाफ सह जाऊन या पांढऱ्या रंगाच्या पिकप गाडीस पकडून सदर गाडीमध्ये पाहणी केली असता यामध्ये काळ्या पांढऱ्या रंगाची 18 जर्सी खोंडे व एक काळ्या पांढऱ्या रंगाची जर्सी गाय त्यांचे पाय घट्ट दोरीने बांधलेल्या अवस्थेत व त्यांची कोणत्याही प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था न केल्याचे दिसून आले. त्यावेळी सदर आरोपीस या जनावरांना घेऊन जाण्याकरिता पशुवैद्यकीय दाखला आहे का व जनावरे वाहतुकीचा परवाना आहे का असे विचारले असता त्याने नकारात्मक माहिती दिल्याने सदरची जनावरे ही कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झाल्याने पिकअप चालक दत्ता तुकाराम शिंदे राहणार सोमंथळी याच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरची सर्व मुकी जनावरे फलटण येथील गोपालन व गोसंवर्धन संस्थेमध्ये जमा करण्यात आलेली असून या कारवाईत एकूण 7 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक सातारा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण,चार्ज दहिवडी यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, अमर नारनवर, रूपाली फडतरे, नीता पळे, सुरेश हांगे, महावीर कोकरे, सोम गोसावी, योगेश सूर्यवंशी, हर्षदा गडदे.