अवकाळी पावसाने म्हसवडला झोडपले
अठवडी बाजारात नुसता राडा

म्हसवड( वार्ताहर)—-
गत दोन दिवसांपासुन म्हसवडसह परिसरात अवकाळी पावसाने अक्षरशा थैमान घातले असुन वादळी वार्यासह पडणार्या अवकाळी पावसामुळे परिसरातील लगान मोठी झाडे उन्मळुन पडल्याचे चित्र आहे, तर म्हसवडच्या अठवडी बाजारातही पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे व्यापारीवर्गाची त्रेधातिरीपिट उडाल्याचे चित्र आहे.
माण तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडतो असे आजवरचे चित्र आहे, यंदा मात्र मान्सुनपुर्व पावसाने माण तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे, गत दोन दिवसांपासुन म्हसवड शहर व परिसरात पावसाने अक्षरशा धुमाकुळ घातला आहे. शहर व परिसरात पडत असलेल्या पावसामुळे शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे, काही ठिकाणी झाडे पडण्याचे तर काही ठिकाणी विद्युत तारा पडण्याचे प्रकार घडले असल्याने विजेचा शहर व परिसरात लंपडाव सुरु आहे.
बुधवार हा म्हसवड शहराचा अठवडी बाजार असुन या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची धावपळ झाली. बाजार निमित्त छोट्या व्यावसायिकांनी लावलेल्या दुकानातील भाजीपाला पावसाच्या पाण्यात तरंगताना दिसुन आला यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले, या शिवाय पावसापुर्वी झालेल्या वादळी वार्यामुळे आंबा शेतकर्यांचेही मोठे नुकसान झाले आहे वार्याने झाडावर पिकलेले आंबे गळुन पडण्याचे अनेक ठिकाणी प्रकार घडले आहेत, तर हवालदारवाडी येथील एका शेतकर्याचे शेडनेट उडुन गेल्याचा प्रकार घडला आहे. म्हसवड शहर व परिसरातील शेतकर्यांनी जनावरांसाठी केलेले कडवळ पुर्णपणे साफ झाले आहे यामुळे भविष्यात जनावरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे, तर वैरणीचे दर गगणाला भिडणार आहेत, एकुणच मान्सुनपुर्व पावसाने धुमाकुळ घालत अनेकांचे नुकसान केले असुन या नुकसानीचे पंचनामे शासनाने करुन शेतकरीवर्गाला मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे.
फोटो