
परिस्थिती व बुटकेपणा यावर मात करून विक्रम मासाळ यांची उच्च पदाला गवसणी
म्हसवड वार्ताहर
परिस्थिती अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो. जिद्द चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर सगळ्या गोष्टी वर मात करता येते. हे विक्रम पावसाळ्याने दाखवून दिले आहे .उंची अतिशय कमी फक्त अडीच फूट .
अडिच फुट उंचीचा विक्रम हा ग्रॅज्युएट झाल्यापासून सरकारी नोकरीचे स्वप्न बघत होता. अतिशय हलाखीची परिस्थिती आई वडील शेती मध्ये कामं करून खायचे आणि यातच तो मोठा झाला उंची कमी असल्यामुळे लोक त्याला बुटका म्हणून सगळे चिडवायचे पण या चिडवण्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही.
मनात एकच जिद्द बांधली की मला कलेक्टर व्हायचंय आणि त्यांने ते स्वप्न देखील पूर्ण करून दाखवलं नुकतीच एमपीएससी परीक्षेमध्ये महसूल सहाय्यक पदावर महसूल विभागात त्याची निवड झालेली आहे.
ही निवड होताच मासाळवाडी म्हसवड परिसरातील लोकांनी त्याची प्रचंड अशी भव्य मिरवणूक काढली आणि या मिरवणुकीमधून हजारो लोकांनी सहभाग घेतला.
हजारो तरुण या मध्ये सामील झालेले होते .
विक्रम याने दाखवून दिलं की परिस्थिती व बुटकेपणा हा आपल्या जीवनामध्ये कधीच अडसर होत नसतो. या बुटकेपणावर मात करून त्याने स्वतः सरकारी पदाला गवसणी घातलेली आहे .
असा हा विक्रम मासाळ यांनी केलेला, विक्रम निश्चितच कौतुकास्पद असा आहे.
म्हसवड येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रमोद गावडे यांनी त्यांचा नुकताच सत्कार करून त्याला पेढा भरवला आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले.