साताऱ्यात परवाना नसतानाही स्टॅम्प वेंडर व पिटीशन रायटर करतात विक्री

Spread the love

….
सातारा दि: सातारा तहसील कार्यालयामध्ये विनापरवाना स्टॅम्प वेंडर अनाधिकृत पणाने व्यवसाय करत आहे. काहींच्या परवान्याचे नूतनीकरण झाले नाही परंतु आर्थिक व्यवहार करून खिसे भरले जात आहेत. याबाबत तक्रार करणाऱ्या संबंधितांनाच दोषी ठरवून अपमानित केल्याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी बहुजनांचा समाजसेवक श्री मिलिंद वामन कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत माहिती अशी की, सैदापूर तालुका जिल्हा सातारा येथील मिलिंद वामन कांबळे यांनी सातारा तहसीलदार आवारातील विनापरवाना स्टॅम्प वेंडर व पिटीशन रायटर स्टॅम्पचीवविक्री करीत असल्याची लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर ६ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषण केले होते. हे उपोषण मागे घेण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस दलाने काही आश्वासने दिली त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे या विनापरवाना स्टॅम्प वेंडर व पिटीशन रायटर म्हणजे जिल्हा प्रशासनाला डोईजड ठरले आहेत का? त्यांच्या आर्थिक ताकतीपुढे कायदा सुद्धा नतमस्तक होत आहेत का? असा सवाल श्री मिलिंद कांबळे यांनी केलेला आहे. दरम्यान, सदर प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे यांनी निवेदन दिल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय अधिकारी सातारा यांच्याकडे लेखी अर्ज पाठवला आहे. परंतु अद्यापही ठोस कारवाई झालेली नाही. याचाच अर्थ जिल्हा प्रशासन चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालत आहे. जे परवानाधारक परवाना काढून व्यवसाय करत आहेत. त्यांच्या सोयीनुसार कामकाज करण्याऐवजी चोराला उचलू लागण्याचा प्रकार जिल्हा प्रशासन करत आहे.
या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल अशी माहिती मिलिंद कांबळे यांनी दिलेली आहे. दरम्यान ,या प्रकरणाला छेडा लावण्यासाठी १७ मार्च रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर पुन्हा एकदा उपोषण आंदोलन केले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. सदर काही स्टॅम्प वेंडर हे सर्वसामान्य जनतेची लूट करत आहेत. त्यामुळे विनापरवाना शासनाची व जनतेची लूट होत असूनही त्याबाबत कारवाई केली जात नाही. हे जगातले आठवे आश्चर्य ठरले आहे. अशी माहिती आंदोलन मिलिंद कांबळे यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

+———————————–


फोटो – समाजसेवक मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!