
वडूज, दि.21(प्रतिनिधी )
विनोद लोहार
ग्राहक चळवळीतील अग्रणी असलेल्या जागृत ग्राहक राजा संस्था या ग्राहक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन २२ व २३ फेब्रुवारी रोजी स्व.बिंदुमाधव जोशी नगरी,द्वारा आर्यन वर्ल्ड स्कूल,भिलारे वाडी ,जुना कात्रज घाट,पुणे येथे आयोजित केल्याची माहिती राज्य सचिव प्रा.नागनाथ स्वामी,संघटक दिलीप पाटील व खजिनदार विद्याधर कुलकर्णी यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती –
सदरचे अधिवेशन निवासी असून दोन दिवस चालणार आहे.यासाठी राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सेवा भावी,अभ्यासक व परिपूर्ण ग्राहक कार्यकर्ता घडावा या भूमिकेतून संघटनेने वर्षभरात हजारो उपक्रमातून ग्राहकांना त्यांच्या हक्काबाबत जागृत करण्याचा प्रभावी प्रयत्न केला आहे. या प्रयत्नात संघटनेचा आधार हा कार्यकर्ता असतो. त्याला प्रशिक्षित ,संस्कारित व कार्यरत करणे हा अधिवेशनाचा मूळ हेतू आहे,त्यासाठी या अधिवेशनात ग्राहक आयोग अध्यक्ष,अनिल जवळकर,पोलिस तक्रार प्राधिकरणाचे अध्यक्ष,रामेश्वर जटाले, राज्य रिटेल व्यापारी संघटनेचे राज्याध्यक्ष ,सचिन निवंगुने,उद्योगपती अशोक चोरघे,गिरीश देशपांडे ,धनंजय मुळे दैनिक सकाळ चे उपसंपादक,सुभाष खुटवड,आर्यन वर्ल्ड स्कूल चे एम डी मिलिंद लडगे,ज्येष्ठ पत्रकार श्यामकांत पात्रीकर, दिलीप फडके,किशोर लुल्ला अशा मान्यवरांची अभ्यास सत्रे होणार आहेत.
याशिवाय क्रियाशील ग्राहक कार्यकर्ते,समाजाभिमुख कार्य करणारे प्रशासकीय अधिकारी यातून निवड झालेल्यांना ” बिंदुमाधव जोशी ग्राहक योद्धा ” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच ” ग्राहक संरक्षण ” या विषयावरील राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण होणार आहे.
ग्राहक चळवळीशी संबंधित कार्यकर्त्यांनी अधिवेशनाचा लाभ घ्यावा असे ही संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.