१०५ वसंत पाहिले, निसर्ग व संविधानात रुजले — गायकवाड वडिलांच्या स्मृतीस नतमस्तक”

Spread the love

औंध प्रतिनिधी- ओंकार इंगळे

वयाच्या १०५ व्या वर्षीही चेहऱ्यावर शांत तेज असलेले, आयुष्यभर निसर्गावर आणि संविधानावर नितांत प्रेम करणारे राजा भगवंतराव जुनिअर कॉलेज चे प्राध्यापक गुलाब गायकवाड व कुटुंबीयांचे वडील कै. भैरू गायकवाड अखेरच्या प्रवासाला निघून गेले. ता .२७एप्रिल रोजी त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणी गाढ आठवणींना जिवंत ठेवताना, गुलाब गायकवाड आणि कुटुंबीयांनी प्रथम पुण्यस्मरणी १०५ रोपांचे वितरण केले होते तर द्वितीय पुण्यस्मरणी १०५ संविधान प्रतींचे वितरण करत एक अनोखी आदरांजली अर्पण केली. त्यांच्या कार्यातून केवळ कृतज्ञता नाही, तर भावी पिढीला विचारांची आणि हरिततेची शिदोरी देण्याचा प्रयत्नही केला गेला.”
जीवनभर निसर्गावर जिवापाड प्रेम करणाऱ्या वडिलांच्या आठवणींना जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक रोप एका नव्या सुरुवातीचे प्रतीक बनले. “वडिलांना झाडे, फुलझाडे, आणि हिरवी वनश्री फार प्रिय होती. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ आम्ही रोपे वाटली,” असे गुलाब गायकवाड यांनी सांगितले.
याच आदर्शाने प्रेरित होऊन द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त १०५ भारतीय संविधानाच्या प्रती शाळा, महाविद्यालये आणि वाचनालयांना भेट देण्यात आल्या. वडिलांची संविधानातील नितीमूल्यांवर असलेली निष्ठा पुढे नेण्याचा हा प्रयत्न होता. “लोकशाही, बंधुता आणि समतेचे मूल्य वडिलांच्या प्रत्येक कृतीत दिसायचे. त्यांची शिकवण आम्ही समाजात रुजवावी, हीच खरी आदरांजली,” असेही गुलाब गायकवाड म्हणाले.
या प्रसंगी स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती. सर्वांनी गायकवाड कुटुंबाच्या या कार्याचे कौतुक करत, वडिलांच्या स्मृतीला मनःपूर्वक नमन केले.
ज्यांनी निसर्ग आणि संविधान या दोन आधारस्तंभांना आयुष्यभर आपल्या जीवनाचा भाग बनवले, त्यांच्या स्मृतीतून समाजाला हरिततेचा आणि संविधानाच्या मूल्यांचा अनमोल वारसा लाभतो आहे.

-१०५ वर्षे त्याचं आयुष्य होतं त्यानिमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम आम्ही गेली दोन वर्षे झाले राबवत आहे इथूनपुढे ही प्रत्येक वर्षी पुण्यस्मरण निम्मित समाजपयोगी उपक्रम घेऊ -(गुलाब गायकवाड,सर )

चौकट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!