वडूज येथे गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा..

Spread the love

शुक्रवार दिनांक 3/10/2025
प्रतिनिधी वडूज: विनोद लोहार
वडूज शिक्षण विकास मंडळ, वडूज संचलित महात्मा जोतिबा फुले पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सन 2024-25 मध्ये NSSE, मंथन, अभिरूप, I Am Winner या स्पर्धा परीक्षांमध्ये इयत्ता 1ली ते 4थीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले. गुणवंत विद्यार्थ्यामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे.
या सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान संस्थेचे जेष्ठ विश्वस्त श्री. सतिश शेटे यांनी भूषवले. याप्रसंगी व्हा.चेअरमन श्री.विजय म्हामणे, सेक्रेटरी श्री. सचिन काळे, स्कुल कमिटी चेअरमन श्री. संतोष कांबळे जेष्ठ विश्वस्त डॉ. हेमंत पेठे, श्री. संजय येवले, श्री. अशोक भंडारे उपस्थित होते.
तसेच वडूज शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन श्री.गोविंद भंडारे ज्येष्ठ संचालक श्री. विश्वासराव काळे, श्री. सुधाकर भंडारे, श्री. श्रीकृष्ण पेठे, श्री. प्रशांत शेटे, श्री. सुभाष येवले, श्री गजानन शेटे, श्री. शैलेंद्र देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र, रोख रक्कम या स्वरूपात सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला शालेय समिती सदस्य व पालकांची उपस्थिती लक्षनीय होती.
विद्यार्थी मनोगतात वर्गशिक्षकांनी व आई वडिलांनी घेतलेले परिश्रम व भविष्यातील स्वप्ने याविषयी मुलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पालक मनोगतात डॉ. सचिन पवार, श्री. विक्रम चव्हाण, सौ. धनश्री पवार यांनी शालेय नियोजन, शिस्त आणि विविध उपक्रम यावर कौतुकाचे उदगार काढले.
संस्था मनोगतात डॉ. पेठे यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले. शिक्षकांच्या मेहनतीचे हे फलित आहे असे सांगून अभ्यासासोबत शिस्तीचे महत्व सर्वांना पटवून दिले.
अध्यक्षीय भाषणात श्री. सतिश शेटे यांनी प्राथमिक विभाग म्हणजे संस्थेचे लाडके आपत्य असून या विभागाच्या सर्व प्राथमिक गरजां कडे आमचे लक्ष असते. उत्तरोत्तर या विभागाची प्रगती होत राहील अशा सदिच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री. अशितोष गवळी सर, प्रास्ताविक मुख्यध्यापिका श्रीम. शितल शिंदे, बक्षीस वाचन श्री. सतिश पवार यांनी केले.
हा संपूर्ण विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्तमरीत्या पार पाडण्यासाठी शाळेचे शिक्षक वृंद सुवर्णा लोहार,सुजाता जाधव,मनीषा खाडे,शिवानी पवार शिक्षकेतर कर्मचारी मीनल देशपांडे, दिपाली टाकणे,पिंकी पाटोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
शाळेच्या जेष्ठ शिक्षिका श्रीम.विजया खराडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!