म्हसवड वार्ताहर
छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल,कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय नेमबाजी स्पर्धेमध्ये मेरी माता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसवड तसेच आर्यमान रायफल शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या एकूण 5 खेळाडूंनी नागपूर येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तर नेमबाजी स्पर्धेकरिता पात्रता मिळवली. यामध्ये कु. आसावरी मेळावणे 17 वर्षाखालील मुली पीपसाईट 🥇सुवर्णपदक 🥇, पृथा शिरकांडे 14 वर्षाखालील मुली ओपन साईट 🥉 कांस्यपदक 🥉, स्वरा कलढोणे 17 वर्षाखालील मुली एयर पिस्टल 🥈रौप्यपदक 🥈, 19 वर्षाखालील मुली पीपसाईट अनुष्का मंगरुळे 🥇सुवर्णपदक 🥇व पायल नांदुगडे 🥉कांस्यपदक 🥉 या पाचही खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले . हे सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक संतोष खासबागे, बंडोपंत लोखंडे,प्रशिक्षक आकाश गुजरे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी खेळाडूंचे युथ ऑलम्पिक मेडलिस्ट आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू माने,कोल्हापूर विभागाचे विभागीय उपसंचालक सुहास पाटील, सातारा जिल्ह्याचे जिल्हा क्रीडाअधिकारी नितीन तारळकर, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, मनीषा पाटील, क्रीडा अधिकारी सुमित पाटील, रवी पाटील,विद्यालयाचे प्राचार्य फादर सनु, उपप्राचार्य जवळकोटी मॅडम, तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बडवे सर, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पत्रकार मित्र यांनी अभिनंदन केले.



