म्हसवड… प्रतिनिधी
माण खटाव वन विभागातर्फे खटाव तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्याकडे ने वृक्षारोपण केलेले आहे. मात्र माण तालुक्या बाबत द्वेष का असा प्रश्न शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केला आहे.
खटाव तालुक्यातील मायणी ते कुकडवाड खिंड या दरम्यानच्या रस्त्या कडेने चांगल्या वाढलेल्या उंच रोपाचे वृक्षारोपण केलेले आहे. यादरम्यान रस्ता दुतर्फा हजारो सावली व शोभिवंत उपयोगी अशी झाडे लावलेले आहेत. मात्र माण तालुक्याची हद्द सुरू होणाऱ्या कुकडवाड खिंड ते म्हसवड हा रस्ता मात्र वृक्षारोपण पासून वंचित आहे. महाराष्ट्र शासनाने सेवा पंधरवड्या निमित्त शासनाच्या प्रत्येक विभागाला वैशिष्ट्यपूर्ण काम करण्याबाबत सूचित केलेले आहे. मात्र माण खटाव मधील वनविभाग,, सामाजिक वनीकरण विभाग विकास कामापासून अलिप्त का ? केवळ कागदोपत्री घोडे नाचवण्याचा डाव तर आहे ना असा प्रश्न वृक्षप्रेमी मंडळी विचारत आहे. कुकुडवाड खिंड ते म्हसवड या दरम्यानच्या रस्त्यावर मायणी रस्त्याप्रमाणेच हजारो झाडे लावल्यास त्याचा पर्यावरण पूरक लाभ होईल. सुदैवाने यंदा या परिसरात पाऊसमान चांगले असून कुकुडवाड म्हसवड यादरम्यानच्या रस्ता दुतर्फा सामाजिक वनीकरण तसेच वनविभागा ने अग्रक्रमाने वृक्षारोपण करावे अशी मागणी कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी केली आहे.
वनविभागाला माण तालुक्याचा द्वेष कशासाठी ? ?.