“अनुदान हडपले , कारवाई ची मागणी “
दहिवडी प्रतिनिधी:
( एकनाथ वाघमोडे )
माण तालुक्यातील दुष्काळ हा पाचवीला पुजलेला होता मात्र कार्यक्षम व तालुक्याचे मंत्री जयकुमार गोरेनी पाण्याची व्यवस्था केल्यापासून काही भागात सुकाळ आहे परंतु माण मध्ये जून च्या सुमारास अवकाळी पाऊस झाला त्यात शेतकरी पिके पूर्ण पाण्यात ,वाहून, बुडून कुजून गेली त्याच वेळी शासकीय स्तरावरून पंचनामा करून अहवाल पाठवण्याचे आदेश आले मात्र पाणवन गावातीलच रहिवासी असलेल्या कृषी सहाय्यक व भोसले कृषी सहाय्यक यांनी गावातील दोनशे ते तीनशे लोकांना वंचित ठेवले
शिंदे कृषी सहाय्यक काने स्वतःची बायको ,मुलगा, भाऊ, आई ,स्वतः व मामाची मुले ,नातेवाईक, यांची नावे घालून शासकीय अनुदान मिळवले अशा अनेक योजनेत त्याने डल्ला मारल्याची चर्चा गावात खुमासदार पणे सुरू आहे सध्यातरी गाव मात्र त्याने फाट्यावर मारले असून ज्यांचे पंचनामे केले त्यांचे पंचनामे गायब केले असून ते पुरावे फोटो , व्हिडिओ , पंचनामा अर्ज शेतकरी यांचेकडे उपलब्ध आहेत
सध्या राज्यातील अन्नदाता अडचणीत आहे पिके तर गेलीच वाहून शिवाय माती ही काही शेतकऱ्यांचा शेतात दिसेनाशी झाली आहे पाणवन मधील सर्व शेतकरी चिंतेत असून यांच्या हाता तोंडाशी आलेला घास मात्र पाण्यात सडून वाहून बुडून गेला मात्र या कृषी सहाय्यकने शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली असल्याचे भावना गावभर झाली आहे
शासकीय अनुदान पासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री अगदी ग्राउंड स्तरावर येऊन काम करतातत्यांना ही या कृषी सहाय्यकाने ठेंगा दाखवला आहे मात्र अशा राजकीय द्वेषातून केलेल्या त्याने करामतीतून गावातील असणाऱ्या कृषी सहाय्यकाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास पळवला आहे ..त्याच्या अनेक भानगडी सध्या गावात ऐकवण्यात येत असून त्याने शेतकऱ्यांना राजकीय भावनेतून वेठीस धरले असल्याची चर्चा सर्व ग्रामस्थांतून होत आहे सध्या पुन्हा पिक नुकसान भरपाई साठी जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी आदेश काढले आहेत
सध्यातरी त्या शिंदे कृषी सहाय्यक याचा खुलासा घेण्याचे काम सुरू असून लवकरच दोषी वर कारवाई केली जाईल
वैभव लिंगे,कृषी अधिकारी दहिवडी
या भानगडी बाज कृषी सहाय्यकाने 250 ते 300न केलेले पंचनामे
आम्ही गोळा केली असून ते शासन दरबारी जमा करणार आहोत
“धुळेश्वर शिंदे,शेतकरी पानवन“
.