म्हसवड पालिकातंर्गत पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर निधीचे वाटप

Spread the love


म्हसवड दि. ३०
म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने राबवण्यात आलेल्या लोककल्याण मेळाव्यामध्ये पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत म्हसवड येथील विविध बचतगटांना व पथविक्रेत्यांना स्वनिधीचे धनादेश देण्यात आले.
म्हसवड पालिकेने दि.२६ रोजी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी सोनिया गोरे , प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसिलदार, विकास आहिर, अपर तहसिलदार सौ.मीना बाबर, वनरक्षक मिसाळ, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, लेखापाल पूनम जाधव, रुपाली माडकर, स्वच्छता निरीक्षक सागर सरतापे, आकाश पिसे, समुदाय संहारक अनिता अनिता करांडे, यासह विविध बँकाचे अधिकारी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पथविक्रेते व बचत गटाचे प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी गाडेकर यांनी सांगितले की केंद्रशासन पी. एम. स्वनिधी योजनेला २०३० पर्यंत मुदतवाढ देणेत आली असून सदर योजने कात १५ हजार २५ हजार व ५० हजार असा बदल करायात आलेला ओहे. सदस्चे कर्ज मुदतीत परतफेड केल्या नंतर द्वितीय टण्यासाठी २५,०००/- त्यानंतर ५०,०००/-रुपये असे या योजनेमधून तीन टपण्यांमधून पथविक्रेता बांधव यांना स्वनिधी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. केंद्रशासनाची पीएम स्वनिधी ही एक महत्वकांक्षी योजना आहे, सदर योजनेचा पालिका हद्दीतील जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावा असे आवाहन केले.
या योजनेचा लाभ घेवु इच्छिणार्या सर्व लाभार्यांना बँकानी कोणतीही आडकाठी न घेता सर्वांनाच याचा अधिक लाभ कसा देता येईल हे पाहवे बँक अधिकार्यांनीही यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन सोनिया गोरे यांनी करताना पथविक्रेत्यांचे कर्ज प्रकरण तात्काळ मंजूर करून कर्ज वितरण होणार सर्व लाभायीचे प्रलंबीत कर्ज प्रस्ताव लवकरात लवकर निकाली काढणेबाबत बँकांना सुचना दिल्या.
यावेळी या लोक कल्याण मेळाव्यात पी एम स्वनिधीचे अर्ज भरणेत आले आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे लोन ऑफीसर साईसकुमार योनी यांनी ५०,०००/- आणि २५,०००/- चे लोन वितरीत केले तर IDBI बँकेचे मॅनेजर वैभव मंडले आणि निनाद सर यांनी संघर्ष महिला बचतगटाला रु. ७ लाख रुपयाचा धनादेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरीत केला.
दरम्यान सदर मेळाव्याच्या ठिकाणी म्हसवड पालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने व कृषी विभागाच्या वतीने विविध माहितीपर स्टॉल उभारण्यात आले होते, सदर ठिकाणांहुन आलेल्या प्रत्येकाला शासकीय योजनांची व कृषी योजनांची माहिती दिली जात होती, सदर स्टॉल ला प्रांताधिकारी गाडेकर, सोनिया गोरे यांनी भेटी दिल्या तर उपस्थित महिलांशी व पथविक्रेत्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या.

फोटो –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!