मायणी वार्ताहर –
स्व. प्रतापशेठ (दादा) साळुंखे : सुवर्ण युगाचा प्रेरणादायी ठेवा
सुवर्ण व्यवसायात आपले अढळ स्थान निर्माण करणारे, हजारो लोकांच्या जीवनाला नवी दिशा देणारे, समाजसेवेच्या कार्यात नेहमी पुढे असणारे स्व. प्रतापशेठ (दादा) साळुंखे यांची आज ८५ वी जयंती. त्यांच्या आठवणी आजही जीवंत आहेत, आणि त्यांनी घडवलेला वारसा आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

२६ मार्च १९४० रोजी सांगली जिल्ह्यातील पारे या गावी जन्मलेले स्व. प्रतापशेठ दादा साळुंखे हे लहानपणापासूनच जिद्दी आणि ध्येयवेडे होते, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने, वयाच्या केवळ १३ व्या वर्षी त्यांनी केरळ गाठण्याचा निर्णय घेतला आणि सुवर्ण व्यवसायाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.
सन १९५४ मध्ये अलेप्पी येथे मामांनी दिलेल्या एक हजार रुपयांच्या मदतीने आणि मित्र कृष्णाच्या साथीने त्यांनी व्यवसाय सुरू केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, भाड्याने घेतलेल्या जमिनीवर झोपडी बांधून त्यांनी आपले पहिले गलाई दुकान सुरू केले, सुरुवातीला दोन महिने कोणतेही काम नव्हते, अश्या परस्थिती मध्ये खचून न जाता अनेक संकटावर मात करत आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी व्यवसाय सुरू ठेवत सुवर्ण रिफायनरीच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
माझ्या सोबत माझ्या भागातील तरुणांना त्यांच्या हक्काचा व्यवसाय व्हावा व त्यांची प्रगती व्हावी म्हणून त्यांनी हजारो तरुणांना व्यवसायात संधी दिली आणि अनेकांना स्वतःची दुकाने सुरू करण्यास मदत केली भारतभर विखुरलेल्या सर्व गलाई बांधवांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी ऑल इंडिया गोल्ड अँड सिल्वर असोसिएशन ची स्थापना करून व्यवसायात येणाऱ्या अनेक अडचणीवर मात करणेसाठी शासन दरबारी गलाई बांधवांची बाजू ठामपणे मांडून अनेकांना न्याय मिळवून दिला म्हणूनच सर्व गलाई बांधवानी स्व. दादांना “सुवर्ण श्री” हि पदवी बहाल केली.
स्व. प्रतापशेठ दादांनी हे आपल्या व्यवसायात तर यशस्वी झालेच परंतु या समाजाने व या मातीने आपल्याला घडवले आहे त्याचे ऋण फेडण्यासाठी शिवप्रताप मानव कल्याण संस्थेची स्थापना करून अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले या मध्ये प्रामुख्याने गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या,मोफत शिक्षण साहित्य देण्यात आले,दुष्काळामध्ये चारा छावणी , पाणी वाटप ,कोरोनासारख्या महाभयंकर परिस्तिथी मध्ये अन्न धान्य किट वाटप,मेडिकल कॅम्प अशे अनेक सामाजिक उपक्रम राबिविले.
आपल्या भागातील लोकांना आर्थिक मदत करणेसाठी व त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणेसाठी व आपल्या लोकांचा कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी स्व. दादांनी शिवप्रताप मल्टी स्टेट संस्थेची स्थापना केली याच्या माध्यमातून समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना सक्षम केलेच परंतु अनेकांच्या हाताला रोजगार निर्माण करून दिला. आज या संस्थेचा व्यवसाय २३ शाखांद्वारे ७०० कोटी रु . इतका पूर्ण झाला आहे.
भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो स्व.दादांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक सर्व अवजारे,औषधें -खाते,साहित्य अतंत्य कमी किंमतीत उपलब्ध होण्यासाठी विटा येथे “शिवप्रताप अग्रो मॉल” ची निर्मिती करून शेतीविषयक सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले. याच्या माध्यमातून आज हजारो शेतकरी याचा फायदा घेत आहेत.
स्व. प्रतापशेठ दादांनी आपल्या संपूर्ण जीवनात समाजातील अंधश्रद्धांना थारा दिला नाही. त्यांनी नेहमी शिक्षण, विज्ञाननिष्ठा आणि आधुनिक विचारसरणी यांना प्रोत्साहन दिले.आज जरी दादा आपल्यात नसले, तरी त्यांची कार्ये आणि विचार आपल्यासोबत आहेत.
“दादा एक महान व्यक्तिमत्त्व, ज्यांनी केवळ आपला नाही, तर हजारो लोकांचा विकास घडवला!”
अश्या महान व्यक्तीमत्वास ८५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन….
अॅड .श्री.विठ्ठलराव साळुंखे
कार्यकारी संचालक
शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था, विटा