
दहिवडी प्रतिनिधी : जयराम शिंदे
माणदेशी मातीतील गुणवंत खेळाडू आर्या काळेल हिने क्रॉस कंन्ट्री या खेळ प्रकारात मध्ये 59th नॅशनल क्रॉस कंट्री ॲथलेटिको
चॅम्पियनशिप 2025 उत्तर प्रदेश मेरठ या ठिकानी झालेल्या स्पर्धेत कास्य पदक मिळवून सातारा जिल्हाची मान उंचावली आहे.मूळची म्हसवड जवळील जांभूळणी येथील असून तिने माण देशी फौंडेशन मध्ये मूलभूत सराव व प्रशिक्षण झालेले आहे सध्या ती पुणे येथे आर्मी गर्ल स्पोर्ट इन्स्टिटयूट पुणे या शासकीय संस्थेत प्रशिक्षण घेत असून माण देशी मातीतील कन्या सध्या आलम्पिक च्या दृष्टीने प्रवास करत असून दुष्काळाच्या कलंक असणाऱ्या माण देशी कन्येने या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेले आहे
तिच्या यशात तिचे माण देशी प्रशिक्षक धुळा कोळेकर, रंजन सर पालक, पुणे येथील प्रशिक्षक रंजन सर यांचे असून तिचे समाजातील सर्व घटकातून तिचे अभिनंदन वर्षाव होत आहे