
म्हसवड वार्ताहर
पैशाचा पाऊस पाडणारा भोंदू बाबा ला म्हसवड पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी.
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील कांता वामन बनसोडे, रा. देवापुर ता. माण जि. सातारा, यांना आरोपी सर्जेराव वाघमारे, रा. म्हसवड ता. माण जि. सातारा याने मंगेश भागवत रा. कळस ता. इंदापुर जि. पुणे हे मायाक्का देवीचे पुजारी असुन ते दैवी शक्तीचे व जादु टोण्याचा वापर करुन पैशाचा पाऊस पाडुन आपलेकडील रक्कम 20 पट करुन देतात असे सांगितले. होते .
त्यावेळी त्यांनी नकार दिला म्हणून सर्जेराव वाघमारे, रा. म्हसवड ता. माण जि. सातारा याने मंगेश भागवत यांस म्हसवड येथे बोलावून घेवून त्यांची कांता बनसोडे व त्यांचे इतर सहकारी यांचे सोबत भेट करुन दिली. त्यावेळी मंगेश भागवत याने त्यांना तुम्ही पैसे द्या तुम्हांला मी पैश्याचा पाऊस पाडुन दाखवतो व त्यानंतर तुम्ही पैसे द्या असे सांगितले.
भोंदू बाबा मंगेश भागवत रा. कळस ता. इंदापुर जि. पुणे यांनी तुम्हांला पैश्याचा पाऊस कसा पडतो हे दाखवतो म्हणून मंगेश भागवत यांचे घरी घरामध्ये असलेल्या रुमध्ये हळदीकुंकाचे गोल रिंगण करुन त्यामध्ये काळ्या कपड्याचे बाहुल्या व पिना टोचलेले लिंबु ठेवून त्यांना रिंगणात बसण्यास सांगितले .
कांता बनसोडे यांच्या व सहकाऱ्यांच्या डोळ्यास पट्टी बांधुन मंगेश भागवत व सर्जेराव वाघमारे यांनी मंत्र म्हणून पट्टी सोडण्यास सांगितले.
त्यावेळी सदर रुममध्ये हळदीकुंकाचे गोल रिंगणामध्ये 500 रुपये भारतीय चलनाचे नोटाचे बंडलाचा ढीग दिसला त्यावेळी खरोखरच पैश्याचा पाऊस पडतात यावर विश्वास बसला त्यावेळी पैश्याचा पाऊस पाडुन देतील .
असा विश्वास संपादन करुन संगनमताने त्यांची फसवणुक करुन आम्हांला पुजेचे साहित्यसाठी 36 लाख रुपये द्या ,
असे सांगुन सर्वांकडुन 36 लाख रुपये रक्कम घेवून दिनांक 11/02/2024 रोजी मंगेश भागवत यांचे राहते घरी पैश्याचा पाऊस पडणार आहे.
सांगुन त्यांना पांढऱ्या कपड्यामध्ये बांधलेले 6 बॉक्स त्यावरती लिंबु बांधलेले 6 बॉक्स घेवून कांता बनसोडे यांना देवून 6 बॉक्सवरती हळदीकुंकू टाकुन त्यामध्ये 36 कोटी रुपये असल्याचे सांगुन बरोबर 21 दिवसानंतर अभिषेक घालून बॉक्स उघडल्यास घरात पैश्याचा पाऊस पडतो असे सांगितले 21 दिवसानंतर अभिषेक करुन बॉक्स उघडला असता बॉक्समध्ये वर्तमानपत्राची रद्दी असल्याचे दिसले व फसवणुक झाल्याचे लक्षात आले.
सदरचे प्रकाराबाबत कांता वामन बनसोडे, रा. देवापुर ता. माण जि. सातारा, यांनी दिले फिर्यादीवरुन म्हसवड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 0005/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 316(2), 3(5) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समळु उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्यांतील आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हे गुन्हा घडलेपासुन नजरेआड होता. सदर गुन्ह्यांतील आरोपीचा शोध घेण्यासाठी मा. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सो, सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सोो, सातारा, मा. श्रीमती अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधीकारी सोो, दहिवडी उप विभाग, व श्री. घनश्याम सोनवणे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. सखाराम बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, व पोलीस उपनिरीक्षक, अनिल वाघमोडे व अंमलदार यांनी सदर गुन्ह्यांतील आरोपीचा गोपनिय बातमीदारामार्फत व तात्रिंक माहीतीच्या आधारे शोध घेवून आपल्या कौशल्याचा परिपूर्ण वापर करुन मुख्य आरोपी मंगेश गौतम भागवत वय ३२ वर्षे, रा. कळस ता. इंदापुर जि. सोलापुर यांस वालचंदर नगर ता. इंदापुर जि. पुणे येथुन ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल तपास करुन त्यास अटक करण्यात आली आहे.
तसेच म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. सखाराम विराजदार, यांनी गुन्ह्यांतील अटक आरोपी मंगेश गौतम भागवत, वय ३२ वर्षे, रा. कळस ता. इंदापुर जि. सोलापुर व सर्जेराव संभाजी वाघमारे, रा. म्हसवड ता. माण जि. सातारा यांनी जादुटोणा करुन फसवणुक केली असल्यास समोर यावे व नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा करुन पैश्याचा पाऊस पडत नाही.
अश्या भुलथापा वळी पडु नये व अशा भुलथापा देणारे इसमांबाबत काही माहीती मिळाल्यास पोलीस ठाण्यास कळविण्याचे आवाहन केले आहे.
सदरची कामगिरी समीर शेख, पोलीस अधीक्षक सोो, सातारा मा., श्रीमती. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा व मा. श्रीमती अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, दहिवडी विभाग, दहिवडी व श्री. घनश्याम सोनवणे, पोलीस निरीक्षक, वडुज पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. सखाराम बिराजदार, अनिल वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक, व अमंलदार जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, सतिष जाधव, संतोष काळे यांनी केली असुन कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अमंलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंद केले.
सदर कामगिरीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, पीएसआय अनिल वाघमोडे,म्हसवड पोलिसांबलदार जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अभिजीत भादुले, सतीश जाधव संतोष काळे यांनी सहभाग घेतला.