
लोणंद वार्ताहर
शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद याठिकाणी आज जिमखाना विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक बक्षीस वितरण समारंभ २०२४-२०२५ संपन्न झाला…
यावेळी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतीस विनम्र असे अभिवादन केले .
या कार्यक्रमास माझ्यासमवेत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. प्राचार्य डॉ. एस.टी.साळुंखे (एस.एम.जोशी महाविद्यालय हडपसर,पुणे), कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ. सी.जे.खिलारे (शरदचंद्र पवार महाविद्यालय,लोणंद ), तसेच मा.उपप्राचार्य बी.डी.जाधव सर, प्रोफेसर अहिवळे सर, भिमराव काकडे सर, एस.व्ही.नालकर सर, एम.डी.नायकू सर, डांगे सर, नाळे सर व सर्वच शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक वर्ग व आजी माजी विद्यार्थी शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद हे सर्व उपस्थित होते.
यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण, कला,क्रीडा सांस्कृतिक या सर्व विभागामध्ये बक्षीस मिळवले त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या…तसेच ज्यांना या स्पर्धेत पारितोषिक नाही मिळाले त्यांनी ही स्पर्धा शेवटची न समजून आयुष्यात अश्या अनेक स्पर्धा आपल्या समोर येणार आहेत .