म्हसवड दि. १ ( महेश कांबळे )
म्हसवड येथील सिध्दनाथ यात्रेनिमीत्त म्हसवड पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या भात्यात आता नवीन फायर बँक बाईक ची भर पडली असुन ही फायर बाईक सध्या यात्रेकरुंचे आकर्षण ठरत आहे.
पालिकेचे आरोग्य निरीक्षक सागर सरतापे यांनी सदर बाईकची माहिती देताना सांगितले की शासनाच्या अग्निशमन संचनालयाच्या वतीने सदर ची फायर बँक बाईक पालिकेला देण्यात आली आहे. या बाईकला फायर बँक यासाठी म्हटले जाते की यामध्ये अपघात नियंत्रण वस्तुंचा समावेश करण्यात आलेला आहे, जसे की एखाद्या ठिकाणी आग लागली तर त्याठिकाणा तात्काळ पोहचण्यासाठी या बाईकला सायरन दिला आहे, तर रुग्णवाहिकेप्रमाणेच दिवा दिला आहे, याशिवाय संबधित विभागाची अधिकची तात्काळ मदत संबधित ठिकाणी पोहचवण्यासाठी सदरच्या बाईकला वॉकी टॉकी सुध्दा देण्यात आलेला आहे, स्पिकर व माईकही या बाईकलाच असल्याने सर्वांना योग्य वेळी गर्दीच्या ठिकाणी नागरीकांना याद्वारे आवाहन करण्यास काहीही अडचण येणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे सदर बाईकच्या दोन्ही बाजुला लावलेल्या डिक्कीमध्ये फम ( आग नियंत्रक लिक्विड ) असल्याने गर्दीच्या व अडचणीच्या ठिकाणी तात्काळ मदत पोहचवण्यासाठी व आग नियंत्रणात आणण्यासाठी सदर ची बाईक एक देणगी ठरणार आहे. यात्रा काळात तर ही बाईक एक पर्वणी ठरणार आहे. अत्यावश्यक सेवा म्हणुनही या बाईकचा नामोल्लेख केला जातो.
शहरी भागात अरुंद रस्ते, गल्ली, बोळात जर एखादी दुर्घटना घडल्यास त्याठिकाणी सदर ची बाईक ही त्वरीत पोहचु शकत असल्यानेच ही बाईक पालिकेसाठी वरदान ठरणार असल्याचे सरतापे यांनी सांगितले.
फोटो