दहिवडी (वार्ताहर )-
रामोशी समाजाच्या मागण्यांसाठी, रामोशी समाजाला घटनात्मक एस,टी आरक्षण अंमलबजावणी करावी यासाठी राज्यभरात साखळी उपोषण सूर असून त्या अनुषंगाने तहसील कार्यालय दहिवडी येथे गेल्या ४ दिवसांपासून श्री. संजय नाना जाधव, रवी नाईक यांच्यासह अनेक समाज बांधव उपोषणाला बसले होते. आज ग्रामविकास मंत्री ना.मा. श्री.जयकुमार गोरे (भाऊ) यांनी उपोषणस्थळी भेट देऊन “रामोशी समाज बांधवांच्या मागण्यांविषयी सरकार सकारात्मक असून त्या संविधानाच्या चौकटीत बसवून सोडवाव्या लागतील. यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच मार्ग काढू,” असा विश्वास त्यांनी दिल्यानंतर साखळी उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दौलतनाना शितोळे, मा.जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे (आबा) यांच्यासह आदि मान्यवर व रामोशी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
