ज्ञान घेऊन समाजासाठी उपयोग करा- कमलाकर भोसले

Spread the love

प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयात निरोप, कॉलेज डे साजरा

मुरूम ता.२२, येथील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयात दि.२२ वार बुधवार रोजी १२ वी विद्यार्थ्यांना निरोप व कॉलेज डे साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना कमलाकर भोसले म्हणाले विद्यार्थ्यांनी ज्ञान घेऊन समाजासाठी उपयोग करावा असे प्रतिपादन केले. उमरगा तालुक्यातील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथील 12 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य, उपप्राचार्य,पर्यवेक्षक,प्राध्यापक पदभार स्वीकारत दिवसभर शालेय प्रशासनह सांभाळले.उमरगा तालुक्यातील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथील बारावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन बुधवार (दि.२२) उत्साहात साजरा झाला. स्वयंशासन दिनाचे एक दिवशीय प्राचार्य म्हणून अपर्णा मनाळे तर उपप्राचार्य म्हणून लक्ष्मी मेनसे आणि भक्ती गायकवाड व निकिता वाकळे हिने पर्यवेक्षक कामकाज सांभाळले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य करबाप्पा ब्याळे, प्रमुख अतिथी कमलाकर भोसले,प्रमुख उपस्थिती उपमुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, ज्येष्ठ प्रा.संजय गिरी,प्रा.उमाकांत महामुनी आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे यांचे मनोगत व्यक्त करताना भोसले पुढे म्हणाले मानव बनण्याचे सामर्थ्य आपल्या मध्ये निर्माण झाले पाहिजे जो मुलगा आपल्या आई – वडिलांना पालक व शेपू समजतो त्याचा कडीपत्ता झाल्याशिवाय राहत नाही. मी कोण आहे याचे आपल्याला माहीत असले पाहिले.आपण काय करणार आहोत हे आपल्या लक्षात घेता आले पाहिजे.चागला माणूस बना व या शाळेचे नाव लवकिक करा असे मनोगत व्यक्त केले. या स्वयंशासन दिनानिमित्त 12 वीच्या विद्यार्थी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी दिलेले विषयावर वेळापत्रकानुसार प्रभावी अध्ययन केले. वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांनीही केलेल्या अध्यापनाबाबत आनंद व्यक्त केला. दुपारच्या सत्रात स्वयंशासन दिनाची सांगता प्राचार्य करबाप्पा ब्याळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी एक दिवसीय प्राचार्य अपर्णा मनाळे, उपप्राचार्य लक्ष्मी मेनसे, विद्यार्थीनी बोळशेट्टे आदींनी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या एक दिवशीय शिक्षकांचा प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून व तसेच विविध खेळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी प्रा. पटवारी शोभा,महामुनी उमाकांत प्रा. शाळु राजीव,प्रा. कांबळे आण्णाराव,प्रा.नारायण सोलंकर,प्रा अजित सूर्यवंशी, प्रा.राठोड दयानंद, प्रा.धर्माधिकारी राघवेंद्र,प्रा.अंबर विश्वजीत,प्रा दीपक सांगळे,प्रा.गायकवाड अमोल, प्रा.वाकडे रत्नदीप,जमादार सलीम,राठोड अजित, कु.उण्णद रेखा,सगशेट्टी महेश,कु.महामुनी साक्षी,फिरोज कागदी,अप्पासाहेब कोळी आदीनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
प्रणिता सगर,सृष्टी व्हणाजे हिने सूत्रसंचालन केले तर श्वेता व्हणाजे हिने आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!