इंदापूर
अखिल भारतीय पत्रकार परिषद आणि इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लि. यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील पत्रकारांची मोफत हृदयरोग तपासणी संपन्न.
इंदापूर (तालुका प्रतिनिधी): इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड इंदापूर यांच्यावतीने इंदापूर तालुक्यातील पहिली कॅथलॅब सेवा सुरू करत असल्याकारणाने इंदापूर तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी मोफत हृदयरोग तपासणी सोमवारी (दि.९) जून २०२५ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत संपन्न झाली.
यावेळी तालुक्यातील सुमारे ५० च्या वरती पत्रकारांची ईसीजी, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, क्रियाटीनीन आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. जे हाय रिस्क रुग्ण आहेत त्यांची टूडी इको ( हृदयाची सोनोग्राफी ) कारियाक मार्कर्स ( लिफिड प्रोफाइल ) सवलतीच्या दरात होणार आहेत.
कार्यक्रम प्रसंगी आपला आहार,व्यायाम, जीवनशैली कशी असावी याबद्दल कार्डिओलॉजी डॉ. रोहन हेगडे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंद्रेश्वर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन डॉ. अनिल शिर्के यांनी सर्व पत्रकारांचे स्वागत करून पत्रकार बांधवांच्या वाढत्या तणाव व त्यामुळे उद्भवणाऱ्या रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार यावर उपाययोजना करण्यासाठी व लवकरच सुरू होत असलेल्या इंदापूर तालुक्यातील पहिल्या कॅथलॅबच्या अनावरणाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार बांधवांसाठी हृदयरोग तपासणी व त्या संदर्भातील उपायोजना यांची माहिती दिली.तर उपस्थित पत्रकार बांधव व डॉक्टरांचे डॉ. मनोज वाघमोडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी डॉ. मंगेश पाटील,डॉ. अमोल रासकर, डॉ अतुल वनवे, डॉ. बिचुकले, डॉ अमीर मुलांनी, डॉ. अर्जुन नरुटे,डॉ. शैलेश काळेल, डॉ श्रद्धा भोसले, डॉ. प्रणाली सरगर इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला सहकार्य डॉ एकनाथ चंदनशिवे, डॉ. किसन शेंडे, डॉ. शिवाजीराव खबाले, , डॉ. राकेश कर्डिले, डॉ. महेश रुपनवर, डॉ. रियाज पठाण,डॉ. रविराज शिंदे, डॉ. पंकज दोशी, डॉ. भाग्यवंत टिळे, डॉ. पाडूळे, डॉ. संतोष शेलार, डॉ. सचिन फडे, शितल बोरा व हॉस्पिटल मधील स्टाफ यांचे सहकार्य लाभले.
शिबिराचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक परिषदेचे इंदापूर तालुकाध्यक्ष संतोष आटोळे यांनी केले तर आभार सोशल मिडिया तालुकाध्यक्ष धनंजय कळमकर व ज्येष्ठ पत्रकार तानाजी काळे यांनी मानले.
चौकट:-
इंदापुरात सर्वप्रथमच सुरू होत असल्याचा कॅथलॅबचा फायदा गोरगरिब रुग्णांनी घ्यावा – डॉ. अविनाश पाणबुडे
इंदापूर तालुक्यात प्रथमच कार्यान्वित झालेल्या प्रधानमंत्री व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तसेच सुरू होणाऱ्या कॅथलॅब चा फायदा घ्यावा. यातून गरीब रुग्णांवर खात्रीशीर इलाज चालू असून यापुढेही अधिकाधिक सुसज्ज सेवा देण्यावर भर देण्यात येईल याची ग्वाही त्यांनी दिली. इंदापूर मध्ये अद्यावत कॅथलॅब नसल्यामुळे रुग्णांना अकलूज, बारामती,पुणे, सोलापूर या ठिकाणी तपासणीसाठी जावे लागत होते. परंतु आता ही सुविधा इंदापुरातच उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना सुविधा पुरवण्यास मदत होणार असल्यास यावेळी डॉ. अविनाश पाणबुडे यांनी सांगितले. या योजनेचा अधिकाधिक लोकांनी फायदा घेण्याचे आवाहन देखील यावेळी डॉ. पाणबुडे यांनी केले. इंद्रेश्वर हॉस्पिटल हे नफा कमवण्यासाठी नसून ते लोकांची सेवा करण्यासाठी आहे असे त्यांनी नमूद केले. या सुविधांमुळे करमाळा, माढा, टेंभुर्णी ,इंदापूर या तालुक्याला मोठा फायदा होणार आहे.रुग्णाची गैरसोय आणि तात्काळ उपचार होणारा असे त्यांनी म्हटले आहे.

००००
फोटो ओळ –
इंदापूर तालुक्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर प्रसंगी सत्कार करतांना इंद्रेश्वर हॉस्पिटलचे विश्वस्त, संचालक मंडळ व डॉक्टर व इतर(छायाचित्र: कैलास पवार)