

पुणे, दि. ११ : पोलिस ठाण्यात ठेकेदारां विरूध्द तक्रार देण्यासाठी गेलेल्या एकास तेथील ठाणे अंमलदार व अन्य तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याची कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करून न घेता उलटपक्षी ठेकेदाराच्या सांगण्यावरून त्यास अमानुषपणे मारहाण केल्याची घटना काळेपडळ तरवडीवस्ती पोलिस ठाण्यात घडली आहे.
या पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार श्री. काळे व अन्य तीन पोलिस कर्मचारी यांची कसून चौकशी करून न्याय देण्याची मागणी रोहन दिलीप वाघमारे
रा. काळेपडळ हल्ली मुक्कम लोणंद,(ता. खंडाळा), जि. सातारा यांनी मुख्यमंत्री साहेब यांना पत्र पाठवून विनंती केली आहे.अन्यथा या विरूध्द कुटंबासमवेत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात रोहन दिलीप वाघमारे
रा. काळेपडळ हल्ली मुक्कम लोणंद, (ता. खंडाळा), जि. सातारा यांनी म्हटले आहे की, ठेकेदार राजू यांचेकडे मी काम करत होतो. मला माझ्या कामाचे पैसे ते वेळेवर देत नव्हते.वारंवर दमदाटीची भाषाही ते मला करत होते. माझ्या कामाचे पैसे मागण्यासाठी गेलो असता त्यांनी माझ्या बुलेट गाडीची चावी काढून घेतली. ठेकेदार राजू यांच्या मीत्रानेही तुझी गाडी व पैसे देत नाही.असे म्हणुन गाडी हिसकावुन घेतली. तुला कोठे जायचे तेथे जा, माझ्या सगळीकडे ओळखी आहेत.असे म्हणून पुन्हा पैसे मागायला आलास तर तुला संपवून टाकेन अशी धमकीही दिली. या कारणांवरून ३० डिसेंबर २०२४ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास
काळेपडळ तरवड वस्ती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता ठेकेदाराने माझ्या अगोदर पोलीस ठाण्यात जावून ठाणे अंमलदार श्री. काळे यांच्याशी सल्ला मसलत करून चिरी मीरी देवून त्यांना माझ्या गाडीची कागद पत्रे तपासा व कारवाई करण्याचे सांगून गाडीची चावी माझ्या हातात ठेवून ते दोघे निघून गेले. त्यानंतर पोलीसांनी मला आत बोलवले. गाडीची कागद पत्रे आहेत का आशी विचारणा केली, कागदपत्र आणून देतो म्हणून सांगूनही पोलीसांचे ऐकले नाही.पोलीस अमंलदार श्री.काळे व अन्य तीन पोलीसांनी मला तेथे जबरदस्त अमानुषपणे मारहान केली. दुचाकी बुलेट मोटार सायकलचा सायलेन्सर गाडी रेस करुन गरम करून माझे तोंड त्याला चिकटवले व माझ्या हातावर,पायावर मारहान केली. त्यामुळे मी भयभीत झालो.औषध उपचार करूनही मी अदयापही आजारीच आहे. त्यामुळे कामावरून घरीच आहे. वाणवडी पोलीस ठाण्या अंर्तगतच्या काळेपडळ पोलीस ठाण्यातील पोलिस, तक्रार देण्यासाठी गेलेल्यांवर असा अत्याचार करतात का ? त्यांना मारहान करण्याची परवानगी कोणी दिली ? माझ्याकडे काही कागदपत्रे नव्हती तर त्यांनी माझ्यावर कोर्टकेस करायला हवी होती. मात्र ठेकेदार राजू व त्याच्या मित्राच्या सांगण्यावरून मला पोलिसांकडून अमानुष मारहाण झाली आहे.मारहान करत असताना म्हारामांगाचे लोक हे असेच असतात व त्यांना सरकारने डोक्यावर घेतले आहे. त्यामुळे त्यांचे लाड झाले आहेत. जरा काय झाले तर हे लोक जातीवाचक फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात येतात. असेही ठाणे अमंलदार श्री. काळे व त्यांचे सहकारी तीघे पोलिस कर्मचारी बोलत होते. मात्र पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी तक्रारदार गेल्यास तेथे त्याला मारहान करण्याचा अधिकार शासनाने पोलिसांना दिला आहे काय ? तक्रार घेणे तर लांबच मात्र तक्रारदाराचे काय म्हणणे आहे ते ऐकून घेण्याची मानसिकताही हे पोलिस कर्मचारी ठेवत नाहीत.अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई व्हावी व यापुढे माझ्या जीवीतास ठेकेदार व त्यांच्या मित्रांकडून धोका आहे. मी त्यांच्या विरूद्ध आपणाकडे पत्र पाठवल्याने माझ्या कुटुंबाचा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर अर्जाची चौकशी व सिसिटीव्हीचे फुटेज तपासुन वाणवडी पोलीस ठाण्यात चौकाशी व्हावी ही अपेक्षा आहे. कारण काळेपडळ तरवडी पोलिस ठाण्यातील पोलीसच माझा घातपात करतील की काय,आशी भितीही आता माझ्या मनात निर्माण झाली आहे. यासाठी मुख्यमंत्री साहेब यांनी चौकशी लावावी. या घटनेची पोल खोल झाल्यास सत्य उघडीस येईल यात तिळमात्र शंका नाही. तसेच नार्को टेस्ट घेण्याची परवानगी मिळावी.तरी संबधीत पोलीस कर्मचारी श्री.काळे यांच्यासह अन्य तीन पोलिस कर्मचारी यांची सखोल चौकशी होवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी.अन्यथा कुटुंबासह उपोषण करण्याचा इशाराही श्री. वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे. या पत्राच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह गृहमंत्री, कोल्हापूरचे आयजी, पुणे व साताऱ्याचे न्यायधिस, मानवी हक्क आयोग, पुणे आयुक्त यांना माहितीसाठी पाठवल्या आहेत.