मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबीर.

Spread the love

दिलिप वाघमारे

लोणंद प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.
आज खंडाळा पूर्व मंडलातर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा.समाजकल्याण सभापती मा.आनंदराव शेळके पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले, यावेळी खंडाळा पूर्व मंडल अध्यक्ष देविदासजी चव्हाण, रोटरी क्लब अध्यक्ष भरतशेठ गांधी, ज्येष्ठ मार्गदर्शक मिठूभाई पटेल, नारायण अण्णा साळुंखे, सुभाष क्षीरसागर, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रदीप क्षीरसागर, जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके पाटील, युवा नेते राहुल घाडगे, नगरसेविका ज्योती डोनीकर, दिपाली शेळके, डॉक्टर किशोर बुटियानी, रोटरी सचिव पवन सूर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष प्रकाश कराडे, नारायणराव ठोंबरे, दिलीप कराडे, अनिल कुदळे, आप्पासाहेब शेळके, कोंडीबा उंब्रजकर, नवनाथ शेळके, विकास ननवरे, रविकांत भोसले, गणेश गुंडगे, संतोष खताळ, तेजस क्षीरसागर, लक्ष्मण कुंडलकर, गणेश हिंगमिरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेल्या आव्हानाला महाराष्ट्रातील नागरिकांनी प्रतिसाद देऊन महारुक्तदान शिबीर आयोजित केले यावरूनच आपल्या नेत्यावर असलेले प्रेम व भावना कार्यकर्ता किती जपतो याचे उदाहरण म्हणजेच आजचे पार पडत असलेले रक्तदान शिबिर आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये जो पार्टीचे प्रामाणिक काम करतो त्याला एक दिवस नक्कीच योग्य संधी मिळते, त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जाऊन प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे असे आनंदराव शेळके पाटील यांनी आपले भाषणात म्हटले.
खंडाळा पूर्व मंडळामध्ये सर्व नागरिकांना कोणत्याही अडचणीच यापुढे सामोरे जावे लागणार नाही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे नेतृत्वाखाली आम्ही मंडलाध्यक्ष म्हणून 24 बाय 7 सर्वांसाठी वेळ देऊ व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करू असे आश्वासन नवनिर्वाचित मंडलाध्यक्ष देविदासजी चव्हाण यांनी दिले.
स्वागत अनिल जी कुदळे यांनी केले व आभार सरचिटणीस श्रीधर सोनवलकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!