
म्हसवड वार्ताहर
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमीत्त संपूर्ण राज्यभरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असले तरी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या माण – खटाव या मतदार संघात रक्तदानाचे नवे रेकॉर्ड निर्माण केले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमीत्त माण – खटाव मतदार संघात राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते, या निमित्त म्हसवड, दहिवडी व वडुज या तीन मंडलाची स्वतंत्र बैठक ना. गोरे यांनी घेत सर्व कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन केले. ना. गोरे यांनी केलेल्या आव्हानाला कार्यकर्त्यांनी असा काही प्रतिसाद दिला की आजवरच्या सर्व रक्तदान शिबीराचे रेकॉर्ड मोडीत निघुन रक्तदानाचे नवे रेकॉर्ड निर्माण झाले आहे. म्हसवड मंडलात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात शेकडो रक्तदात्यांनी सहभागी होत रक्तदान केले, प्रत्येक रक्तदात्याला ना. गोरे यांच्यावतीने आकर्षक अशी भेटवस्तु देण्यात आली. रक्तदात्यांमध्ये महिलावर्गानेही सहभागी होत रक्तदान केले, सर्व रक्तदात्यांचे आभार मानण्यासाठी ना. गोरे यांनी पत्नी सौ. सोनिया गोरे यांच्या समावेत प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहुन रक्तदात्यांचे आभार मानले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.