म्हसवड पोलीसांनी मोठी कारवाई , वाळू माफिया वर गुन्हा दाखल

Spread the love

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची स्टाफसह पुन्हा एकदा अवैध धंद्यांवर धडक कारवाई

वाळू माफियांना दणका

अवैध वाळू उपसा व वाळू वाहतूक करणाऱ्या आरोपीस डंपर वाहन आणि वाळूसह ताब्यात घेऊन अटक

तब्बल 27 लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

हकीकत
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील शिरताव ते देवापुर जाणारे रोडने एका पिवळ्या रंगाच्या डंपर ट्रकमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असले बाबतची खात्रीशीर बातमी काढून सदर डंपरला पकडण्यासाठी जाऊन त्याचा पाठलाग करून शिरताव गावचे हद्दीत लक्ष्मी देवीचे मंदिराजवळ शिरताव बाजूकडून एक वाहन देवापुर बाजूकडे येत असताना पकडले असता त्यामध्ये तीन ब्रास वाळू भरलेली दिसून आली. त्यामुळे या अनुषंगाने म्हसवड पोलीस ठाण्यात आरोपी नामे

1) नितीन सुभाष लोखंडे, राहणार विरकरवाडी तालुका माण, जिल्हा सातारा

2) अभिजीत संजय सावंत, राहणार दिवड तालुका माण, जिल्हा सातारा

यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून डंपर, वाळू असा 27 लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. म्हसवड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून अवैध वाळू वाहतूक आणि उत्खनन या अनुषंगाने ठोस पाऊल उचलून प्रभावी कारवाई केल्यामुळे आतापर्यंत या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणारे यांचे धाबे दणाणले आहेत.

सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, जगन्नाथ लुबाळ,नवनाथ शिरकुळे, अभिजीत भादुले, संतोष काळे, विनोद सपकाळ यांनी या कारवाईत भाग घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!