अहिल्यादेवी होळकर यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी कार्यरत राहणार – ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे

Spread the love

म्हसवड वार्ताहर :
माण तालुक्याचा विकास साधणे, दुष्काळ निर्मूलन करणे आणि तालुक्याच्या जनतेची अखंड सेवा करणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. माण तालुक्याच्या जनतेने दाखविलेल्या विश्वासामुळेच आज मी मंत्रीपदावर पोहोचलो आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यप्रेरणेने पुढील काळात समाजहिताचे कार्य करत राहणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केले.

म्हसवड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला असून, या पुतळ्याच्या सर्व खर्चाची जबाबदारी स्वतः स्वीकारणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


जनतेसाठी अखंड सेवा

यावेळी बोलताना ते म्हणाले,
“माण तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. परंतु गेल्या १५ वर्षांपासून केलेल्या अथक प्रयत्नांमुळे तालुक्याचा पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लागला आहे. आता पुढील निवडणुका ‘पाणी’ या मुद्यावर लढवाव्या लागणार नाहीत, अशी प्रतिज्ञा मी केली होती. आज तालुक्याचा चेहरा मोहरा बदललेला आहे. या बदलाचे श्रेय जनतेच्या अखंड पाठिंब्यालाच जाते.”


अहिल्यादेवी होळकरांचे कार्य आदर्शवत

“अहिल्यादेवी होळकर या हिंदुहृदयसम्राज्ञी होत्या. त्यांनी १५ हजार हून अधिक मंदिरे पुनरुज्जीवित केली. त्यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे. त्यांच्या विचारांचे बीज जनमानसात पेरणे आणि ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणे हीच माझी खरी जबाबदारी आहे. विरोधक केवळ टीका करण्यात व्यस्त असतात, पण महान नेत्यांच्या विचारांचे आचरण मात्र ते करत नाहीत,” अशी टीकाही त्यांनी केली.


म्हसवडसाठी नवे विकास प्रकल्प

नामदार गोरे यांनी या कार्यक्रमात म्हसवड व माण तालुक्यासाठी अनेक विकास योजनांची घोषणा केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारणीस प्रारंभ.

म्हसवड शहरात विविध विकासकामांना गती.

सनगर समाज सभागृहासाठी १ कोटींचे अनुदान, भव्य सभागृह उभारणीसाठी.

एमआयडीसी प्रकल्पाची उभारणी – महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रगत व आधुनिक औद्योगिक वसाहत म्हसवडमध्ये उभारली जाणार.

शहरातील विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन.


जनतेचे ऋण अमोल

“माण तालुक्याच्या जनतेच्या प्रेमामुळे मला सलग तीन वेळा आमदारकी व मंत्रीपद लाभले. हे ऋण मी कधीच फेडू शकत नाही. आगामी काळात शेतकरी व मेंढपाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हेच माझे ध्येय राहील,” असेही गोरे यांनी सांगितले.


मान्यवरांचे गौरवोद्गार

कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, भाजप नेते शिवाजीराव शिंदे, डॉ. प्रमोद गावडे, इंजिनिअर सुनील पोरे, माजी नगराध्यक्ष सुरेश म्हेत्रे, तालुका अध्यक्ष प्रशांत गोरड आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. वसंत मासाळ यांनी गोरे यांना “माण तालुक्याचे खरे विठोबा” असे संबोधत, धनगर समाजासाठी आधुनिक समाजमंदिरासाठी निधीची मागणी केली.

डॉ. प्रमोद गावडे यांनी पंढरपूर यात्रेचे प्रभावी नियोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक करताना, “वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे व जनतेच्या प्रेमामुळेच आज ते विकासाची नवी दारे उघडू शकले आहेत,” असे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत मासाळ यांनी केले तर आभारप्रदर्शनही त्यांच्या हस्तेच संपन्न झाले.

माण खटाव लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे मा. नगराध्यक्ष डॉ.वसंत मासाळ, युवा नेते लुणेश वीरकर,सामाजिक कार्यकर्ते विजय बनगर,मा.नगरसेवक आप्पासाहेब विरकर,अस्थिरोग तज्ञ डॉ. बाबासाहेब दोलताडे, युवा कार्यकर्ते विशाल विरकर, लक्ष्मण विरकर (करले) , कृष्णदेव मदने,पोपट मासाळ,डॉ प्रमोद गावडे,दादासाहेब दोरगे,नारायण मासाळ,रामभाऊ कोडलकर,म्हसवड मंडल चे अध्यक्ष प्रशांत गोरड,नानासाहेब दोलताडे,सचिन विरकर, यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!