


फलटण वार्ताहर..
मलटण येथे नगरसेवक अशोकराव जाधव उर्फ काका यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव महाराष्ट्र मित्र मंडळ व शिवतेज क्रिकेट क्लब मलटन यांच्यावतीने भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. ६/१२/२०२४ ते दि. ८/१२/२०२४ या दिवशी कै. लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर क्रीडा संकुल मलटण, श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल समोर मलटण येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष आहे.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस चि. विहान भोसले पाटील यांच्या वतीने ३५ हजार रु., द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जयवंत शिंदे यांच्या वतीने २५ हजार रु., तृतीय क्रमांकाचे बक्षीस स्वप्निल पवार साहेब यांच्या वतीने १५ हजार रु., चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस दीपक देशमुख यांच्या वतीने ७ हजार रु. देण्यात येणार आहे. तसेच संग्राम सावंत यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच – चषक रिजवान खान यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज – सायकल देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ओंकार भोसले यांच्या सौजन्याने बॉल बॉक्स व सचिन अहिवळे आणि संदीप घाडगे यांच्या सौजन्याने टी-शर्ट देण्यात येणार आहेत.