ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे
यांनी दहीवडी बस आगाराला 10 नवीन बसेस मंजूर करून दिल्या.
म्हसवड वार्ताहर

*#दहिवडी बस #आगाराला 10 नविन “एसटी बसेस,प्रवाशी वर्गातून समाधान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी भाजपा कार्यकारणी सदस्या, श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका
सौ. सोनिया जयकुमार गोरे
(वहिनीसाहेब) यांच्या हस्ते झाले पूजन…
दहिवडी एस.टी आगारामधील बसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.
नविन बस मिळाव्या यासाठी सर्वच स्तरावरून अनेक दिवसापासून दहिवडी आगारातून मुंबई ,पुणे सह महाराष्ट्रातील इतर शहरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून नवीन बस मिळाव्यात प्रवास सुखकारक व्हावा अशी मागणी होत होती त्या मागणीची दखल घेऊन ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी राज्यशासनाच्या माध्यमातून 10 बसेस मंजूर केल्या दहिवडी एसटी आगारात 10 नविन बसेस दाखल झाल्या त्या अद्ययावत व अत्याधुनिक सुविधेने परिपूर्ण अशा नवीन बसेसचा लोकार्पण व पूजन सोहळा आज दहिवडी (माण) आगार येथे संपन्न झाला या नवीन बसचे पूजन सौ.सोनिया जयकुमार गोरे (वाहिनिसहेब) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या नवीन 10 बस 🚎 दहिवडी मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सेवेत रुजू झाल्यामुळे त्यांच्या प्रवासात अधिक सुलभता येईल .
नुकत्याच राज्य सरकारने ५,००० नवीन बसेसची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, यातील जास्तीत जास्त बसेस आपल्या विभागात मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
दहिवडी आगारातील अधिकारी कर्मचारी प्रवासी व विविध संघटना यांनी मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्याकडे सतत केलेला पाठपुरावा आणि आज बसेस आगारात दाखल झाल्यावर कार्यक्रमाचे केलेले नियोजन याचे नक्कीच कौतुक आहे. परिवहन हा दळणवळण, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा घटक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, यांनी राज्यभरातील वयोवृद्ध व्यक्तींना बसचा प्रवास मोफत आणि समस्त महिला भगिनींना बस प्रवासात अर्धे तिकिटाची सूट देऊन पुन्हा एकदा सर्वसामान्यांना राज्य शासनाच्या बस प्रवासाकडे मोठ्या संख्येने वळविण्याचे काम केले आहे.
आज महायुतीची सत्ता असताना मंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून यापुढील काळात अधिकचा निधी आणण्याचा प्रयत्न राहील असे सौ. सोनिया जयकुमार गोरे यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी सातारा जिल्हा परिषद माजी सदस्य ,श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण (आबा) गोरे , आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे, प्रताप आप्पा भोसले, दहिवडी नगरीचे माजी नगराध्यक्ष सतीशदादा जाधव, मा.नगरसेवक महेश कदम,नगरसेवक रुपेश मोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रवींद्र तुपे, स्वप्नील मोरे ,लाला ढवाण, विशाल घोरपडे यंत्र अभियंता विकास माने साहेब, उपयंत्र अभियंता सूर्यवंशी साहेब,आगार व्यवस्थापक दहिवडी कुलदीप डुबल साहेब, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक वंजारी साहेब ,जगदीश लोंढे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक हनुमंत फडतरे, वाहतूक निरीक्षक बाबुराव खाडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक प्रल्हाद कबाडे ,वाहतूक नियंत्रक संतोष (आप्पा) बोराटे ,सुरेश भोजने, नवनाथ शेंडे,शिवाजी खाडे, सुरेश दळवी ,विजय पोळ, कादर शिकलगार, सचिन लवटे, गजानन शिंदे ,वरिष्ठ लिपिक दादा खाडे ,लिपिक अमोल शेंडे, संतोष शिंदे ,स्वप्निल माने, महेश कदम ,चालक, वाहक कार्यशाळा कर्मचारी यांच्यासह आगाराचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

